ETV Bharat / state

कोणत्याही ओबीसी नेत्यावर अन्याय झाला नाही - माधव भांडारी

भाजप नेत्यांनी बहुजन समाजातील लोकांचा निवडणुकीत वापर केला आणि नंतर त्यांना खड्यासारखे बाजूला केले. भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो, असा आरोप शेंडगे यांनी केला होता.

Madhav Bhandari
माधव भांडारी
author img

By

Published : Dec 5, 2019, 9:16 PM IST

मुंबई - भाजपने कायम ओबीसी नेत्यांना संपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप माजी आमदार शेंडगे यांनी केला होता. यावर भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी शेंडगे हे सर्व पक्षांमध्ये फिरून जिथे सत्ता असेल तिथे चिटकणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याकडे लक्ष देण्याचे काही कारण नाही. भाजपमध्ये कोणत्याही ओबीसी नेत्यांवर कधीही अन्याय झालेला नाही, असे प्रतिउत्तर भाजपने दिले आहे.

माधव भांडारी, भाजप प्रवक्ते

हेही वाचा - उद्धव ठाकरेंनी केली बाळासाहेबांच्या पुतळ्याची पाहणी, 23 जानेवारीला उभारणी

भाजपमध्ये आतापर्यंत अण्णासाहेब डांगे, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे आणि आत्ता पंकजा मुंडे यांना डावलण्यात आले. भाजप नेत्यांनी बहुजन समाजातील लोकांचा निवडणुकीत वापर केला आणि नंतर त्यांना खड्यासारखे बाजूला केले. भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो, असा आरोप शेंडगे यांनी केला होता.

हेही वाचा - #BhiwandiMayorElections: कोणार्क आघाडीच्या प्रतिभा पाटील विजयी; सौदेबाजीमुळे काँग्रेसच्या पदरात पराभव

यावर शेंडगे यांना भाजपबद्दल बोलण्याचा काहीही अधिकार नाही. प्रकाश शेंडगे हे सर्व पक्षांमध्ये फिरून जिथे सत्ता असेल तिथेच चिटकणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना कोणत्याही समाजामध्ये कशाही प्रकारचे स्थान नाही. त्यांना नेता हा शब्द लावावे, असे कोणतेच कारण नाही. त्यामुळे प्रकाश शेंडगे यांनी भाजपला काही बोलण्याचे कारण नाही. भारतीय जनता पक्षाच्या उभारणीमध्ये ओबीसी समाजाचे व ओबीसी नेत्यांचे मोठे योगदान आहे याची भाजपला जाणीव आहे. आतासुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त आमदार हे ओबीसी समाजाचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे शेंडगे हे अपप्रचार करत आहेत, असे भांडारी यांनी सांगितले.

Intro:भाजपने कायम ओबीसी नेत्यांना संपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप माजी आमदार शेंडगे यांनी केला. यावर भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी शेंडगे हे सर्व पक्षांमध्ये फिरवून जिथे सत्ता असेल तिथे चिकटणार व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याकडे लक्ष देण्याचे काही कारण नाही भाजपमध्ये कोणत्याही ओबीसी नेत्यांवर कधीही अन्याय झालेला नाही असे प्रतिउत्तर भाजपने दिलेले आहे .

Body:भाजप मध्ये आतापर्यंत अण्णासाहेब डांगे ,गोपीनाथ मुंडे एकनाथ खडसे आणि आत्ता पंकजा मुंडे यांना डावलण्यात आले. भाजप नेत्यांना बहुजन समाजातील लोकांच्या निवडणुकीत कसा वापर करायचा आणि त्यानंतर खड्यासारखे बाजूला कसे करायचे अशी भाजपची भूमिका राहिली आहे . त्यामुळे यापासून सावध राहिले पाहिजे एका मुलाखतीदरम्यान शेंडगे यांनी म्हटले होते.

या शेंडगे यांच्या या आरोपावर भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांना विचारले असता ते म्हणाले की , शेंडगे यांना भाजप बद्दल बोलण्याचा काहीही अधिकार नाही. प्रकाश शेंडगे हे सर्व पक्षांमध्ये फिरून जिथे सत्ता असेल तिथेच चिकटनारा व्यक्तिमत्त्व आहे . त्यांना कोणत्याही समाजामध्ये कशाही प्रकारचे स्थान नाही. त्यांना नेता हा शब्द लावावे असं कोणतंच कारण नाही. त्यामुळे प्रकाश शेंडगे यांना भाजपला काही बोलण्याचा कारण नाही . भारतीय जनता पार्टीच्या उभारणीमध्ये हे ओबीसी समाजाचे व ओबीसी नेत्यांचे मोठे योगदान आहे याचे भाजपला जाणीव आहे आहे . आणि त्याची कल्पना देखील आहे. आतासुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त आमदार हे ओबीसी समाजाचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे विश्वास शेंडगे हे करत असलेला अपप्रचार आहे . हे काँग्रेसने केलेले प्रचार अपप्रचार आहे असं म्हणत भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय झालेला नाही असे त्यांनी म्हटले.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.