मुंबई : मुंबई विभागातील म्हाडाची 2 हजार 386 घरांची सोडत मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निघणार आहे. विजेचे बिल कमी असणार अशा घरांमध्ये सौरऊर्जेची सोय केली जाणार. आर्थिक दुर्बल घटक, अल्प उत्पन्न घटक यांच्यासाठी ही सोडत निघणार आहे.
मार्चमध्ये म्हाडाची सोडत - मुंबईत असंख्य हजारो लाखो कुटुंब आहे, ज्यांना आपले हक्काचे घर हवे आहे. हक्काचे घर शासनाच्या म्हाडा सारख्या सरकारी एजन्सीकडून मिळाले तर, ते प्रत्येकाला आवडेल. म्हणूनच यंदा मार्च 2023 पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हजारो घरांची सोडत निघणार आहे.
ऑनलाईन अर्ज करता येणार - खाजगी घरांच्या किमती अत्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे घर घेणे सामान्य माणसांना शक्य होत नाही. त्यामुळेच मध्यमवर्गीय असो किंवा आर्थिक दुर्बल घटक असो किंवा अल्प उत्पन्न घटकाचा अथवा उच्च उत्पन्नघटक असोत शासनाकडून तयार झालेले घर जर पदरात पडले तर आनंद द्विगुणीत होतो. त्यामुळे शासनाने यावर्षी काही नवे बदल करत म्हाडाच्या घरांची सोडत पुण्यातून सुरू केली. मात्र, मुंबई विभागाची ही सोडत मार्च 2023 मध्ये केली जाईल. या सोडतीसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
आर्थिक दुर्बल घटकांसाठी प्रथम सोडत - म्हाडा आर्थिक दुर्बल घटकांसाठी 1 हजार 947 घर सोडतीमध्ये असणार तर अल्प उत्पन्न गटासाठी 736 घर असे एकूण 2 हजार 683 घर दोन महिन्यानंतर नागरिकांना मिळू शकणार आहेत. आर्थिक दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गट यासाठी ही सर्वप्रथम सोडत निघणार आहे. त्यासाठीची माहिती येत्या काही दिवसातच म्हाडाच्या वतीने प्रसिद्ध केली जाणार आहे.
प्रथमच भोगवटा प्रमाण पत्र प्राप्त ग्राहकांना घरे - पूर्वी सोडतनंतरची चार ते सहा महिन्याची प्रक्रिया ही वेळखाऊ होती. परंतु आता ती वेळखाऊ प्रक्रिया काढली गेली आहे. म्हाडाच्या सांगितलेल्या सूचनेनुसार भरणा केली की, काही दिवसातच तुम्हाला हे भोगवटा प्रमाणपत्र मिळू शकेल.
ओ सी म्हाडा कडूनच मिळेल - पूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये घर बांधली जायची. एकदा तुम्ही ऑनलाईन घरात बसून म्हाडाच्या पोर्टलवर नोंदणी करायची. तिचे एकदा पात्र झाला की तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही म्हाडाच्या विभागात घरांकरिता नोंदणी करू शकतात. तसेच पूर्वी महानगरपालिका ओसी द्यायची परंतु माढा ही नियोजन प्राधिकरण असल्यामुळे आता ओ सी म्हाडाकडूनच मालकाला मिळणार आहे. यासंदर्भात म्हाडाचे उपमुख्य अभियंता किशोर काटवटे यांनी ईटीवी भारत सोबत बातचीत करताना माहिती दिली की, मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये 2023 याच वर्षी 2 हजार 683 घरांची ही सोडत निघणार आहे.
हेही वाचा - Republic Day : यावर्षी इजिप्तचे राष्ट्रपती प्रजासत्ताक सोहळ्याचे प्रमुख पाहुणे