ETV Bharat / state

खुशखबर.. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार - rainfall in india news

बंगालच्या खाडीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून त्या ठिकाणी चक्रीय वारे बनत आहेत. ही स्थिती प्रभावी होऊन त्याचे परिवर्तन कमी दाबाच्या क्षेत्रात होऊ शकते. येत्या 24 तासांत ही स्थिती निर्माण होऊ शकते. याचा प्रभाव पूर्व भारतातील काही भागात पडण्याची शक्यता आहे, असे स्कायमेटने म्हटले आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
author img

By

Published : Jun 8, 2020, 8:47 PM IST

मुंबई - बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून मोठ्या प्रमाणावर देशातील विविध भागांत पोहचेल, अशी स्थिती निर्माण होत आहे. याबाबतचे वृत्त हवामान विषयक घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या स्कायमेटने दिले आहे.

बंगालच्या खाडीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून त्या ठिकाणी चक्रीय वारे बनत आहेत. ही स्थिती प्रभावी होऊन त्याचे परिवर्तन कमी दाबाच्या क्षेत्रात होऊ शकते. येत्या 24 तासात ही स्थिती निर्माण होऊ शकते. मान्सूनच्या सुरुवातीला अशी स्थिती निर्माण होते. बंगालच्या खाडीवर आता अशी पहिली स्थिती असणार आहे. याचा प्रभाव पूर्व भारतातील काही भागात पडण्याची शक्यता आहे. मान्सून ईशान्य भारतासह, कोकण, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाणाच्या काही भागात सरकेल यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे, असे स्कायमेटने म्हटले आहे.

बंगालच्या खाडीत बनणाऱ्या या स्थितीमुळे दक्षिण पश्चिम मान्सून मोठया प्रमाणावर सक्रिय होईल. बंगालच्या खाडीतून पुढे इशान्य भारत व्यापून पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये पोहचेल. अरबी समुद्रात दक्षिण पश्चिम हवा सक्रिय असल्याने मान्सून कर्नाटक आणि रायलसीमेचे भाग पार करून तेलंगाणात पोहचेल. याचसोबत मुंबईसह, महाराष्ट्रातील कोकण क्षेत्र आणि मध्य महाराष्ट्र विभागात मान्सून पोहचल्याची बातमी मिळणार आहे. येत्या काही दिवसांत मान्सूनच्या सक्रिय होण्यासोबत ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रात 10 ते 16 जूनच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, स्कायमेटने वर्तविली आहे.

नैऋत्य मौसमी पावसाची वाटचाल दक्षिण- मध्य कर्नाटकच्या आणखी काही भागात, रायलसीमेच्या काही भागात, तामिळनाडूच्या बऱ्याच भागात, नैऋत्य बंगालच्या उपसागराच्या संपूर्ण भागात, पश्चिम मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात, मध्य पूर्व बंगालच्या उपसागराच्या संपूर्ण भागात, वायव्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात, तर ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात कायम आहे, असे मुंबई हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 8 ते 12 जूनच्या दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा येथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.