ETV Bharat / state

Mumbai Crime : लग्न करण्यासाठी चोरली बुलेट; बंटी-बबलीचं स्वप्न भंगले

author img

By

Published : Jan 31, 2023, 12:38 PM IST

बोरिवली पूर्व कस्तुरबा पोलिसांनी बुलेट चोरी प्रकरणी दोघांना अटक केली आहे. ते मुंबईतून बुलेट चोरून नाशिकला नेऊन विकायचे. कस्तुरबा पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून 3 बुलेट जप्त केल्या आहेत. आरोपी युवक चोरी करतो आणि युवती कॉल सेंटरमध्ये काम करते. दोघे प्रेमी आहेत आणि भाड्याच्या घरात राहतात. पोलिसांच्या नजरेतून सुटून दोघेही बुलेट चोरून मध्यरात्री नाशिकला घेऊन जायचे.

Mumbai Crime
बुलेट चोरी
बुलेट चोरीच्या कमाईतून बंटी लग्न करायचे होते

मुंबई : राजेंद्र नगर परिसरातील एका सोसायटीतून बुलेट चोरीला गेल्याची तक्रार कस्तुरबा पोलिसांना मिळाली होती. कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पीआय अनिल आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय ओम तोटावार व राहुल वाळुंजकर व टीम हवालदार सुर्वेकर, पाटील, परीट, विचारे, सांगले, गणेश पाटील, शिंगटे सागर पवार झोन १२ लेखक यांनी मिळून राजेंद्र नगर परिसरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.

पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले : कस्तुरबा पोलीस ठाण्यातून बुलेट बाईक चोरीच्या घटनेत पोलिसांना सीसीटीव्हीत चोर दिसत होते, मात्र त्यांची ओळख पटू शकली नाही. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून सापळा रचून चौथी बुलेट चोरण्यापूर्वी बंटी आणि बबलीला अटक केली. हा बुलेट चोर महेश भालचंद्र खापरे वय 27 वर्ष असून तो मुराबाद ठाणे येथील रहिवासी आहे. याशिवाय वाशिंद, इगतपुरी आणि बदलापूर येथे दुचाकी चोरीचे ५ गुन्हे दाखल आहेत.

लग्न करण्यासाठी चोरी करतात : कस्तुर पोलिसांनी सांगितले की, ते राजेंद्र नगर परिसरात भाड्याने राहतात. दोघेही पहाटे एकच्या सुमारास एकत्र बाहेर निघायचे. सोसायटीत बुलेट उभी असायची त्या घरापासून थोडे लांब काही अंतरापर्यंत तो बुलेट ओढून घ्यायचा आणि नंतर चावीशिवाय तो थेट दहिसर शांतीवनच्या दिशेने जायचा. बुलेट कोपऱ्यात ठेवायचा आणि घरी आल्यावर झोपायचा. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दोघेही चोरीची बुलेट नाशिकला घेऊन जायचे आणि तेथे विकायचे. ते दोघे प्रेमीयुगुल असून लग्न करण्यासाठी चोरी करून बुलेट विकत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ते 1 बुलेट 20 ते 25 हजारांना विकत होते. यापूर्वीही त्याच्यावर गुन्हा दाखल होता, तसेच जवळपास 13 महिने तुरुंगात राहिल्यानंतर आरोपी बंटी परतला आहे. बबली कस्तुरबाच्या परिसरात एका कॉल सेंटरमध्ये काम करते.

पत्नीला भेटण्यासाठी दुचाकी चोरी : या आधीही मुंबईत चोरीची घटना घडली होती. पत्नीला भेटण्यासाठी पार्किंगमध्ये उभी केलेली वाहने चोरणाऱ्या दोन चोरट्यांना दिंडोशी पोलिसांनी अटक केली होती. दिंडोशी पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून 7 वाहने जप्त केली होती. त्यांची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये होती. पत्नीला भेटायचे असताना तो दुचाकी चोरून ठाण्यात पत्नीला भेटण्यासाठी जात होता. ही घटना 22 जानेवारी रोजी मुंबई येथील नगर फिल्मसिटी रोडवर घडली होती.

हेही वाचा : Mumbai Crime बनावट व्हिसा देऊन अनेकांना पाठविले विदेशात आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.