मुंबई - फेसबुक आणि व्हॉट्सअपनंतर आता एक नवीन अॅप नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. ते म्हणजे टिक-टॉक अॅप्लिकेशन. सध्या तरुणाईमध्ये टिक-टॉक अॅपची चलती असून या अॅपवर भन्नाट व्हिडिओ अपलोड करुन अनेक जण प्रसिद्धीच्या झोतातही आले. मात्र, आता हा अॅप डोकेदुखीही ठरत आहे. मनोरंजन किवा माहितीपर व्हिडिओ तयार करणे, यासाठी अॅपचा वापर करणे यामध्ये काही गैर नाही. मात्र, त्याला लोक खूप आहारी गेल्याचे दिसत आहे.
काय आहे टिक-टॉक
टिक-टॉक एक सोशल मीडिया अप्लिकेशन आहे. या अॅपवरून युजर छोटे-छोटे (पंधरा सेकंदांपर्यंतचे) व्हिडियो तयार करून शेअर करू शकतात. या अॅप्लिकेशनचे कॉपी राईट 'बाईट डान्स' या चीनी कंपनीकडे आहे. या कंपनीने सप्टेंबर २०१६ मध्ये टिक-टॉक अॅप लाँच केले. २०१८ मध्ये या अॅपची लोकप्रियता प्रचंड वाढली आणि ऑक्टोबर २०१९ ला युएसएमध्ये हे अॅप सर्वाधिक डाउनलोड केले गेले.
फेसबुक, इंस्टाग्राम प्रमाणेच टिक-टॉक अॅप्लीकेशनने तरुण-तरुणींना वेड लावलेले बघायला मिळते. टिक-टॉकवर अकाउंट उघडून तरुण-तरुणी डंबिंग व्हिडिओ तयार करतात. यावर लाईक्स अन कमेंट्सचा भडीमार होतो. तेच व्हिडिओ इतरांच्या व्हॉटसअॅप-फेसबुकच्या स्टेटसवर झळकतात, व्हायरल ही होतात. याचं फॅड दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार दर महिन्याला जवळपास २ कोटी भारतीय याचा वापर करतात. गुगल प्लेस्टोरवर ९ मिलियन लोकांनी टिक-टॉकचा रिव्ह्यू केला आहे. यावरूनच भारतात टिक-टॉकच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल. पण हे डोकं दुःखी ठरत आहे कारण खूप लोक याच्या आहारी गेल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. काही कुटुंबीय याबद्दल चिंत व्यक्त करत आहेत.
मनोरंजन किंवा माहितीपर व्हिडिओ करणे, त्यासाठी अॅपचा वापर करणे यात काही गैर नाही. मात्र, त्यामुळे कोणत्याही सामाजिक घटकांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी. जर या अॅपचा वापर चुकीच्या पद्दतीने होत असेल तर हे खूप धोकादायक आहे. फॅन फॉलोअर्स वाढवण्याचा नादात आपला बहुमूल्य वेळ टिक-टॉकमध्ये घालवतात. हे टिक-टॉकचे व्यसन त्यांना आपल्या आयुष्यात असणाऱ्या महत्वाचा गोष्टींपासून दूर करते, हे चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांचे खासगी आयुष्य धोक्यात येण्याची चिंता मानसोपचार तज्ञ डॉ. सागर मुंडदादा यांनी व्यक्त केले आहे.