ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात पिकांना अतिवृष्टीचा फटका; शेतकरी हतबल - शेतकरी हतबल

गेल्या तीन ते चार वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जळगाव जिल्ह्यात यावर्षी सप्टेंबर महिन्यातच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. दमदार पावसामुळे नद्या, नाले, सिंचन प्रकल्प तुडूंब भरले असले तरी अतिवृष्टीमुळे उडीद, मूग, सोयाबीन तसेच भुईमूग अशा कडधान्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

जळगाव जिल्ह्यात पिकांना अतिवृष्टीचा फटका; शेतकरी हतबल
author img

By

Published : Sep 15, 2019, 7:29 PM IST

Updated : Sep 17, 2019, 8:02 PM IST

जळगाव - गेल्या तीन ते चार वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यात यावर्षी सप्टेंबर महिन्यातच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. दमदार पावसामुळे नद्या, नाले, सिंचन प्रकल्प तुडूंब भरले असले तरी अतिवृष्टीमुळे उडीद, मूग, सोयाबीन तसेच भुईमूग अशा कडधान्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कडधान्य पिकांच्या लागवडीखालील हजारो हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीने प्रभावित झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावला गेल्याने शेतकरीराजा हतबल झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात पिकांना अतिवृष्टीचा फटका; शेतकरी हतबल

हेही वाचा - जळगाव जिल्ह्यात पावसाने ओलांडली वार्षिक सरासरी; आतापर्यंत १०१ टक्के पावसाची नोंद

जळगाव जिल्ह्यात यावर्षी दीड महिने उशिराने पाऊस दाखल झाला. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दमदार पावसाला सुरुवात झाली. मध्यंतरी काही काळ सोडला तर सतत पाऊस पडत होता. सततच्या पावसाचा फटका उडीद, मूग, सोयाबीन तसेच भुईमूग अशा कडधान्य पिकांना बसला आहे. कडधान्य पिकांच्या फुलधारणेवेळी पावसाची गरज असताना त्यावेळी पाऊस झाला नाही. त्यामुळे पिकांची प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावली. त्यामुळे फळधारणेवर परिणाम झाला. उडीद, सोयाबीन शेंगांवर कीडरोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. काही ठिकाणी शेंगा बारीक होत्या. पाऊस सुरूच असल्याने शेतकऱ्यांन उडीद आणि मुगाची काढणी करता आलेली नाही. झाडांवरील शेंगा आता कुजत चालल्या आहेत. काही शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके जळाली आहेत.

हेही वाचा - उल्लेखनीय..! बोंड अळीच्या नियंत्रणासाठी नांदेडमधील शेतकऱ्याचा आगळा प्रयोग

तीन ते चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणारे शेतकरी आता ओल्या दुष्काळामुळे अडचणीत आले आहेत. शासनाने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदतीसह खरीप हंगामाचे पीककर्ज माफ करावे, अशी मागणी होत आहे.

जळगाव जिल्ह्यात एकूण साडेसात लाख हेक्टर क्षेत्र पेरणीलायक आहे. त्यात कापूस, केळी, ज्वारी, बाजरी, मका या नगदी पिकांचे लागवडीखालील क्षेत्र सर्वाधिक असते. उडीद, मूग, सोयाबीन तसेच भुईमूग यासारख्या कडधान्य पिकांचे लागवडीखालील क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणावर असते. कडधान्य पिके ही कमी कालावधीची असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी वेळोवेळी पाऊस आणि उघडीप गरजेची असते. मात्र, सतत पाऊसच पडत असल्याने ही पिके खराब झाली आहेत. ज्वारी, बाजरी आणि मक्याला देखील काही तालुक्यात फटका बसला आहे.

हेही वाचा - राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आज मुख्यमंत्र्यांचा जनादेश, उदयनराजे राहणार उपस्थित

सुरुवातीला दिलासादायक वाटणारा पाऊस आता शेतकऱ्यांना नकोसा झाला आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हा अंदाज खरा ठरला तर जळगाव जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी १२५ टक्क्यांवर जाईल. पाऊस थांबला नाही तर कडधान्य पिकांप्रमाणे कापूस, केळी, मका, ज्वारी, बाजरी ही पिके देखील हातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

Intro:जळगाव
गेल्या तीन ते चार वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जळगाव जिल्ह्यात यावर्षी सप्टेंबर महिन्यातच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. दमदार पावसामुळे नद्या, नाले, सिंचन प्रकल्प तुडूंब भरले असले तरी अतिवृष्टीमुळे उडीद, मूग, सोयाबीन तसेच भुईमूग अशा कडधान्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कडधान्य पिकांच्या लागवडीखालील हजारो हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीने प्रभावित झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावला गेल्याने शेतकरीराजा हतबल झाला आहे.Body:जळगाव जिल्ह्यात यावर्षी दीड महिने उशिराने पाऊस दाखल झाला. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दमदार पावसाला सुरुवात झाली. मध्यंतरी काही काळ खंड सोडला तर सतत पाऊस पडत आहे. सततच्या पावसाचा फटका उडीद, मूग, सोयाबीन तसेच भुईमूग अशा कडधान्य पिकांना बसला आहे. कडधान्य पिकांच्या फुलधारणेवेळी पावसाची उघडीप न मिळाल्याने पिकांची प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावली. त्यामुळे फळधारणेवर परिणाम झाला. शेंगांवर कीडरोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. काही ठिकाणी शेंगा बारीक पडल्या. पाऊस सुरूच असल्याने शेतकऱ्यांना शेतातील शेंगा तोडता आलेल्या नाहीत. झाडांवरील शेंगा कुजत आहेत. काही शेतांमध्ये तर पाणी साचल्याने पिके जळाली आहेत. तीन ते चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणारे शेतकरी आता ओल्या दुष्काळामुळे अडचणीत आले आहेत. शासनाने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदतीसह खरीप हंगामाचे पीककर्ज माफ करावे, अशी मागणी होत आहे.

जळगाव जिल्ह्यात एकूण साडेसात लाख हेक्टर क्षेत्र पेरणीलायक आहे. त्यात कापूस, केळी, ज्वारी, बाजरी, मका या नगदी पिकांचे लागवडीखालील क्षेत्र सर्वाधिक असते. उडीद, मूग, सोयाबीन तसेच भुईमूग यासारख्या कडधान्य पिकांचे लागवडीखालील क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणावर असते. कडधान्य पिके ही कमी कालावधीची असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी वेळोवेळी पाऊस आणि उघडीप गरजेची असते. मात्र, सतत पाऊसच पडत असल्याने ही पिके खराब झाली आहेत. ज्वारी, बाजरी आणि मक्याला देखील काही तालुक्यात फटका बसला आहे.Conclusion:सुरुवातीला दिलासादायक वाटणारा पाऊस आता शेतकऱ्यांना नकोसा झाला आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हा अंदाज खरा ठरला तर जळगाव जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी १२५ टक्क्यांवर जाईल. पाऊस थांबला नाही तर कडधान्य पिकांप्रमाणे कापूस, केळी, मका, ज्वारी, बाजरी ही पिके देखील हातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

बाईट: १) शरद नारखेडे, शेतकरी (चष्मा लावलेले)
२) नितीन चौधरी, शेतकरी (लायनिंगचा ब्लु शर्ट)
Last Updated : Sep 17, 2019, 8:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.