मुंबई - ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी विक्रोळीच्या उदंचन प्राथमिक शाळेमध्ये उद्या गुरूवारी सकाळी 8 वाजल्यापासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर एसआरपीएफ आणि मुंबई पोलिसांची पथके मतमोजणीच्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. या ठिकाणी 400 पोलीस तसेच 500 निवडणूक अधिकारी आणि अतिरिक्त 200 अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.
ईशान्य लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मनोज कोटक व राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील यांच्यात प्रमुख लढत आहे. मतमोजणी केंद्रावर कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस आणि केंद्रीय पोलीस दलाचा याठिकाणी 3 टप्प्यात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी अनोळखी व्यक्तींना मोजणी केंद्रात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपआयुक्त अखिलेश कुमार सिंह यांनी दिली. मतमोजणीच्या ठिकाणी वाहनतळाची व्यवस्थाही 3 टप्प्यात करण्यात आली आहे.