ETV Bharat / state

लोकल सेवा लवकरच पूर्वपदावर; सीएसएमटीहून कर्जत, टिटवाळ्याकडे लोकल रवाना - सायन

सीएसटी-ठाणे आणि सीएसटी-वाशी लोकल ट्रॅकवर मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे. पुढील सुचना मिळेपर्यंत कोणतीही लोकल धावणार नाही. शासनाकडून मुंबईत आठवडाभरासाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई लोकल
author img

By

Published : Jul 2, 2019, 8:06 AM IST

Updated : Jul 3, 2019, 9:35 AM IST

मुंबई - गेल्या चार दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईची लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. ही रेल्वेसेवा आता पुन्हा एकदा पुर्वपदावर येण्याच्या मार्गावर आहे. सीएसएमटीहून ठाणे, कल्याण, बदलापूर,कर्जत आणि टिटवाळा या मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. यामुळे मुंबई अडकलेल्या चाकरमान्यांना घरी जाण्यासाठी याचा फायदा होत आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईची अक्षरशः तुंबई केली. यामुळे सीएसएमटी-ठाणे आणि सीएसटी-वाशीपर्यंतची लोकल सेवा पूर्णतः ठप्प झाली होती. सायन-माटुंगा-कुर्लादरम्यान ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. शासनाकडून मुंबईत आठवडाभरासाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प, पुढील सुचना मिळेपर्यंत कोणतीही लोकल धावणार नाही

मध्य रेल्वेवर चालवण्यात आली विशेष लोकल -
कुर्ला-सायन मार्गावरील लोकल रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने पहाटेपासून लोकल सेवा ठप्प झाली असली तरी, काही रेल्वे स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालविल्या जात आहेत. जागोजागी अनेक प्रवासी रेल्वे स्थानकांवर अडकून पडलेले आहेत. या विशेष लोकल चालविल्यामुळे, या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. काही वेळापूर्वीच कुर्ला ते अंबरनाथदरम्यान एक विशेष लोकल स्लो डाऊन मार्गावरून चालवण्यात आली.

हार्बर मार्गावर पनवेल-वाशी लोकल सुरू

मुंबईतील हार्बर मार्गावर पनवेल-वाशीदरम्यान लोकल सेवा देण्यात येत आहे. हार्बर मार्गावर लोकल सुरु असली तरी इतर ठिकाणी पोहोचण्यास प्रवाशांना अडचणी येत आहेत. त्यामुळे, प्रवाशांचा स्टेशनवर खोळंबा झाला असून लोकलसेवा सुरळीत होईपर्यंत त्यांना अडचणीला सामोरे जावे लागणार आहे.

मुसळधार पावसाने घेतला २३ जणांचा बळी -

मालाडजवळील कुरार भागात सोमवारी रात्रीच्या सुमारास भिंत कोसळून २० जण ठार झाले. येथे अग्निशमन दल आणि एनडीआरऐफकडून बचावकार्य सुरू आहे. याशिवाय कल्याण पश्चिमे कडील दुर्गाडी किल्ल्यासमोरील नॅशनल उर्दू हायस्कुलची सरक्षण भिंत कोसळून घरावर पडल्याने ३ जणांचा मृत्यू झाला आहे. येथे घटनास्थळी अग्निशमनदल आणि बाजार पेठ पोलीस दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे.

समुद्र किनाऱ्यावर उसळू शकतात ४.७९ मिटर उंचीच्या लाटा -

समुद्राला सोमवारी सकाळी मोठी भरती आली होती. आता २ ते ७ जुलैपर्यंत पुढील सहा दिवस सलग तसेच ३१ जुलैला ४.७९ मिटर उंचीच्या लाटा उसळू शकतात. यामुळे समुद्र किनारी नागरिकांनी आणि पर्यटकांनी सावधानता बाळगावी. तसेच जोरदार पावसामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही पालिकेकडून करण्यात आले आहे.

Intro:Body:

ब्रेक- मुंबईतील सायन- माटुंगा दरम्यान लोकल ट्रॅक वर मोठ्या प्रमाणात पानी साठल्याने लोकल सेवा जागेवर ठप्प

Conclusion:
Last Updated : Jul 3, 2019, 9:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.