ETV Bharat / state

शनिवारी मुंबईत 9090, तर पुण्यात 5720 कोरोनाबाधित; राज्याचा आकडा 50 हजारांच्या उंरठ्यावर

Maharashtra corona live update
महाराष्ट्र कोरोना लाइव्ह अपडेट
author img

By

Published : Apr 3, 2021, 6:38 AM IST

Updated : Apr 3, 2021, 10:10 PM IST

22:08 April 03

राज्यात शनिवारी कोरोना रुग्णांची संख्या ५० हजाराच्या उंबरठ्यावर, २७७ जणांचा मृत्यू

मुंबई - राज्यात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. आजची आकडेवारी राज्याची चिंता वाढवणारी आहे. आज राज्यात तब्बल ४९ हजार ४४७ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर ३७ हजार ८२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

22:00 April 03

मुख्यमंत्र्यांची तज्ज्ञांशी चर्चा सुरू

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञांची मते जाणून घेण्याचा आजपासून प्रयत्न सुरू केला आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना लॉकडाऊन संदर्भात काय निर्णय घ्यायचे, यासाठी आपण तज्ज्ञांशी बोलणार आहोत अशी माहिती दिली होती. त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांनी वृत्तपत्रांचे संपादक आणि मालक तसेच थिएटरचे मालक आणि चालक तसेच काही निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली आहे.  

20:05 April 03

मुंबईत दिवसभरात 9 हजार 90 नवे रुग्ण, 27 रुग्णांचा मृत्यू

मुंबई - मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत सलग दोन दिवस 8 हजाराच्यावर रुग्ण आढळून आले आहेत. आज त्यात वाढ होऊन तब्बल 9090 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्षभरातील सर्वाधिक रुग्णांची नोंद आज झाली आहे.
 
19:01 April 03

मुख्यमंत्र्यांची सर्व क्षेत्रातल्या तज्ज्ञांसोबत बैठक

मुंबई - कोरोना परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. वृत्त पत्राचे संपादक, चित्रपट गृहांचे चालक-मालक आणि नाट्यनिर्माते-दिग्दर्शक यांच्यासोबत ही बैठक होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होणार आहे. दोन दिवसात लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत. त्याआधी सर्व क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी मुख्यमंत्री बोलणार आहेत.  

16:46 April 03

कचरा कुंडीत फेकले पीपीई किट; नागरिकांनी फोडली रुग्णवाहिका

सांगली - सांगलीच्या गणेशनगर स्विमिंग टॅंकच्या मागे असणाऱ्या महापालिकेच्या कचरा कुंडीत वापरलेले पीपीई किट टाकण्याचा प्रकार स्थानिक नागरिकांनी उघडकीस आणला. यानंतर संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिका फोडल्याचा प्रकार घडला आहे. तर महापौरांनी पीपीई किट प्रकरणी आदित्य डायग्नोस्टिक सेंटरला एक लाखांचा दंड ठोठावला आहे.

16:38 April 03

आजपासून धार्मिक स्थळे बंद; श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टतर्फे 24 तास ऑनलाईन दर्शनाची सोय

पुणे - पुणे शहरात आजपासून पुढील सात दिवसांसाठी मिनी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. सर्वच धार्मिक स्थळे पुढील सात दिवसांसाठी बंद करण्यात आली आहेत. मिनी लॉकडाऊनमुळे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्टच्यावतीने देखील प्रशासनाच्या आदेशानुसार पुढील सात दिवसांसाठी मंदिर बंद ठेवलं आहे. भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.

16:19 April 03

एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारसोबत - भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय

मुंबई - काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला कोरोनापासून काळजी घ्या असे आवाहनसुद्धा केले आहे. या वेळेस मुख्यमंत्री यांनी विविध देशांचा कोरोनाची माहिती जनतेसमोर ठेवून आपल्या राज्यात किती मोठी भयंकर कोरोनाची परिस्थिती आहे ती कशी वाढत चाललेली आहे या सगळ्या संदर्भात माहिती दिली. रुग्ण वाढ अशीच वाढत राहिली तर पुन्हा एकदा महाराष्ट्रात लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय उरणार नाही, अशी देखील माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिली. यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी यावर टीका केली आहे. तसेच राज्याचा एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारसोबत आहोत, परंतु सरकारने समाजातील सर्व घटकांचा विचार करून लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा, अशी मागणी देखील या वेळेस केशव उपाध्याय यांनी पत्रकार परिषदेत केली.

15:18 April 03

पीएमपीएमएल बस सेवा सुरू ठेवा, खासदार बापट

पुणे - शहरात पीएमपीएमएल बस सेवा सुरू करावी या मागणीसाठी भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले. पुण्यात मिनी लॉकडाऊन करत असताना पीएमपीएमएल बस सेवा बंद करण्यात आली त्याला भाजपचा विरोध आहे, ही सेवा सुरू करावी यासाठी खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पीएमपीएमएल मुख्यालयात आंदोलन करत असताना पोलिसांनी गिरीश बापट आणि कार्यकर्त्याना ताब्यात घेतले.  

15:14 April 03

नाशिक शहर व जिल्ह्यातील उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण खालीलप्रमाणे

ग्रामीण भागात नाशिक ५८४, बागलाण १ हजार ८३, इगतपुरी ३७१, मालेगांव ग्रामीण ८३१, चांदवड १ हजार ४०, सिन्नर ५७३, दिंडोरी ५१९, निफाड १ हजार ६७०, देवळा ८७१ , नांदगांव ५१५, येवला ३६४, त्र्यंबकेश्वर १६८, सुरगाणा १५२, पेठ ६१, कळवण ४१५ असे एकूण ९ हजार २१७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १६ हजार ९२७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ८७९ तर जिल्ह्याबाहेरील २०८ असे एकूण २८ हजार २३१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ८९ हजार ३०१ रुग्ण आढळून आले आहेत.

15:12 April 03

नाशिक जिल्ह्यात एकूण 28 हजार 231 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक - जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ५८ हजार ६४५ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत २८ हजार २३१ रुग्णांवर उपचार सुरु असून, आतापर्यंत २ हजार ४२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचा उद्रेक सुरू असून रोज तीन ते चार हजार नवीन कोरोना रुग्ण आढळून येत असून सद्यस्थितीत २८ हजार २३१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन सक्रीय आहे. त्यासाठी विविध पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. यात चाचण्या, लसीकरण व उपचाराच्या सुविधांवर भर देण्यात येत आहे.

12:43 April 03

खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांना कोरोनाची लागण

मुंबई - शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना कोरोनाची लक्षणे दिसत होती. चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पत्नीला कोरोनाची लागण झाल्याने आता संजय राऊत यांनाही कोरोनाची चाचणी करावी लागणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि त्यांच्या आई रश्मी ठाकरे यांना देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे.

11:49 April 03

पुण्यात मिनी लॉकडाऊन विरोधात भाजपचे आंदोलन

पुणे - शहरात आजपासून सात दिवस मिनी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचा आज पहिला दिवस आहे. मात्र, भाजपने याला तीव्र विरोध केला आहे. खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुण्यात आंदोलन केले आहे. 

11:47 April 03

लॉकडाऊन करून कोरोना आटोक्यात येणार नाही - प्रकाश आंबेडकर

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधत येत्या एक-दोन दिवसात लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा दिला होता. याला वंचित बहुजन आघाडीने विरोध केला आहे. लॉकडाऊन करून कोरोना आटोक्यात येणार नाही. शिस्त पाळणे, सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. सरकारने लॉकडाऊन करू नये, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

11:35 April 03

लॉकडाऊन महाराष्ट्राला परवडणारा नाही; मनसेचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

मुंबई - काल (शुक्रवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. येत्या तीन ते चार दिवसात कोरोनाची स्थिती सुधारली नाही तर, लॉकडाऊन करावे लागेल, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. लॉकडाऊन हा एकच पर्याय नाही. पुन्हा जर संपूर्ण लॉकडाऊन केले तर ते लॉकडाऊन महाराष्ट्राला परवडणार नाही, असे मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी म्हटले आहे.

11:20 April 03

पुण्यात मिनी लॉकडाऊनचा पहिला दिवस; मंडईमध्ये तुरळक गर्दी

पुणे मंडईमध्ये नागरिकांचा तुरळक वावर आहे

पुणे - शहरात आणि जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आता शनिवार 3 एप्रिलपासून पुढील 7 दिवस संपूर्ण जिल्ह्यात सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुणेकरांची लॉकडाऊनपासून सध्या सुटका झाली असली तरी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंधांची कडक अंमलबाजवणी करण्यात येणार आहे. आज पुण्यातील मिनी लॉकडाऊनचा पहिला दिवस आहे. मंडईमध्ये नागरिकांचा तुरळक वावर दिसून आला.

11:14 April 03

नियमांचे काटेकोर पालन केल्यास लॉकडाऊनची आवश्यकता भासणार नाही

नाशिक - ग्रामीण भागातील ज्या गावांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या अधिक आहे, अशा गावांमध्ये पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी. ग्रामीण भागातील गृह विलगीकरणातील रूग्णांची यादी आरोग्य प्रशासनाने पोलीस प्रशासनाला द्यावी. अशा रूग्णांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना प्रसार वाढत आहे. त्याला रोखण्यासाठी मालेगाव येथील शासकीय विश्रामगृहात सर्व विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्याप्रसंगी मंत्री भुसे बोलत होते. सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन केल्यास लॉकडाऊनची गरज भासणार नाही, असे देखील भुसे म्हणाले.

09:48 April 03

अहमदनगरमध्ये एका दिवसात 1 हजार 800 नविन रूग्णांची नोंद

अहमदनगर - कोरोना रूग्ण संख्येच्याबाबतीत नगर जिल्हा राज्यात सातव्या क्रमांकावर आहे. कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असून याला नागरिकांचा बेफिकीरपणा कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. काल (शुक्रवारी) एकाच दिवशी जिल्ह्यात कोरोनाचे 1 हजार 800 नविन रूग्ण आढळले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे. जे नागरिक आणि व्यावसायिक कोरोनाचे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वतः मैदानात उतरत कारवाई सुरू केली आहे.

09:45 April 03

पुण्याचे जिल्हा माहिती आणि जनसंपर्क अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनामुळे निधन

पुणे - जिल्हा माहिती आणि जनसंपर्क अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. ससून रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू केले जात होते. 

09:44 April 03

वाशिममध्ये रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता

वाशिम - कोरोना विषाणू संसर्गापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी जिल्ह्यात १७ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. लस घेतल्यानंतर किमान दोन महिने रक्तदान करता येत नाही. यामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली असून रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता उद्भवली आहे. वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय व एक खासगी अशा दोन रक्तपेढ्या कार्यान्वित आहेत. महिन्याकाठी साधारण २५२ बॅग रक्ताची गरज भासते. मात्र, शासकीय रक्तपेढीत केवळ १५२ बॅग रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे.

08:36 April 03

मुख्यमंत्री करणार विविध तज्ञांशी चर्चा

मुंबई - राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना नियम पाळण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आज(शनिवारी) मुख्यमंत्री विविध तज्ञांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.

08:35 April 03

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्र वगळता पालघर जिल्ह्यातील शाळा करणार बंद

पालघर - जिल्ह्यात वसई-विरार महानगरपालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यातील सर्व शाळा ५ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिले आहेत. पालघर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तसेच यापूर्वी विविध शाळांमध्ये आजाराचे झालेले संक्रमण लक्षात घेता जिल्हाधिकार्‍यांनी हे आदेश दिले आहेत.

07:29 April 03

रत्नागिरीत कोरोना रूग्ण संख्येत वाढ

रत्नागिरी - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना मोठ्या प्रमाणावर फोफावू लागला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात तब्बल 155 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या 155 पैकी 111 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले, तर 44 रुग्ण अँटीजेन टेस्ट केलेले आहेत. गेल्या सहा महिन्यांत एका दिवसात 155 रुग्ण सापडण्याची ही पहिली वेळ असून मागील काही दिवसांपासून वाढणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे.

07:27 April 03

कोरोनाचे बळी ठरलेल्या पत्रकारांच्या कुटुंबांना शासनाने मदत करावी - आमदार कपिल पाटील

मुंबई - कोविडमुळे आतापर्यंत ७० पत्रकारांचा बळी गेला आहे. पत्रकारांची भूमिका कोरोना योद्धांपेक्षा वेगळी नाही. जोखीम पत्करून त्यांनी लॉकडाऊनच्या काळात काम केले. अर्ध्या पगारावर किंवा बिनपगारी देखील काम केले. जे मृत्यूमुखी पडले त्यांचे कुटुंबीय आता वाऱ्यावर आहेत. त्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही. मृत्यूमुखी पावलेले पत्रकार आणि अन्य माध्यम कर्मचारी यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.  

07:25 April 03

जेष्ठ पत्रकार विजय दिघे यांचे कोरोनामुळे निधन

नागपूर - जेष्ठ पत्रकार विजय दिघे यांचे काल(शुक्रवार) कोरोनामुळे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. विजय दिघे यांनी ईटीव्ही मराठीत वृत्त निवेदक म्हणून पत्रकारिता क्षेत्रात २००० साली पदार्पण केले होते.  

07:22 April 03

कोरोनाच्या काळातही नवी मुंबईकरांनी भरला मालमत्ता कर

नवी मुंबई - कोरोनाच्या काळातही नवी मुंबई महानगर पालिकेमध्ये मालमत्ता कराची 540 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा. 19 हजर 891 करधारकांनी अभय योजनेचा लाभ घेतला आहे. ही बाब पालिकेच्या दृष्टीने चांगली आहे.

07:21 April 03

पुण्यात आजपासून सात दिवस मिनी लॉकडाऊन

पुणे - शहरात आणि जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आता शनिवार 3 एप्रिलपासून पुढील 7 दिवस संपूर्ण जिल्ह्यात सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुणेकरांची लॉकडाऊनपासून सध्या सुटका झाली असली तरी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंधांची कडक अंमलबाजवणी करण्यात येणार आहे. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी 2 एप्रिलला उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

06:06 April 03

राज्यात शुक्रवारी २०२ कोरोनाबाधितांचा मृत्यू

मुंबई - राज्यात सातत्याने कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. शुक्रवारी नव्या 47 हजार 827 रुग्णांची नोंद झाली तर, 202 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि वाढणारे मृत्यूचे प्रमाण प्रशासनाच्या चिंतेत भर घालणार आहे. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना रुग्णवाढ कायम राहिली तर लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत दिले आहेत. 

राज्यातील कोरोनाची स्थिती
राज्यात गेल्या 24 तासात राज्यात नव्या 47 हजार 827 रूग्णांची नोंद झाली. 24 हजार 126 रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तर, 202 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 24 लाख 57 हजार 494 रूग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात कोरोना रूग्णांचा मृत्यूदर 1.91टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 29 लाख 04 हजार 76 रूग्णांची नोंद झाली आहे. सध्या राज्यात 3 लाख 89 हजार 832 इतके एकूण सक्रीय रूग्ण आहेत.

Last Updated : Apr 3, 2021, 10:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.