आज दिवसभरातील घडामोडी -
- 10.21 PM - शिवसेनेच्या आमदारांना घरी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या ६ दिवसांपासून सर्व आमदार हॉटेल रिट्रीटमध्ये होते.
- 8.50 PM - काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक सुरू झाली असून त्यामध्ये अजित पवार देखील उपस्थित आहेत. त्यामध्ये सर्वसमावेश कार्यक्रमावर चर्चा केली जात आहे.
- 8.17 PM - काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक उद्या होण्याची शक्यता असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले.
- 7.50 PM - काँग्रेसची अंतर्गत चर्चा झालेली आहे. राष्ट्रवादीकडून बैठकीसाठी अद्याप बोलावणे आले नाही. त्यांनी बोलावल्यानंतर आम्ही जाऊ, असे अशोक चव्हाण म्हणाले.
- 7.45 PM - काँग्रेस, राष्ट्रवादीची बैठक ऐनवेळी रद्द झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
- 7.06 PM - देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असे आम्ही सांगत होतो. मात्र, त्यावेळी सेनेचे कोणीही बोलले नाहीत. निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपदाची मागणी करीत होते. त्यामुळे आम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करू शकत नसल्याचे भाजप अध्यक्ष अमित शाह म्हणाले.
- 6.34 PM - काँग्रेस, राष्ट्रवादीचा सर्वसमावेश कार्यक्रम ठरल्यानंतर सेनेसोबत चर्चा - जयंत पाटील
- 3.33 PM - शिवसेना युवा नेते आमदार आदित्य ठाकरे रिट्रीट हॉटेलमधून मातोश्रीकडे रवाना
- 3.31 PM - आमचे बोलणे झाले असून आम्ही योग्य वेळी बोलू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
- 3:14 PM- सिल्वर ओक बंगल्यावर अजित पवार येणार आहेत, त्यानंतर कोणत्याही प्रकारची बैठक होणार नाही - सुप्रिया सुळे
- 3:04 PM आम्ही भेटलो हेच सकारात्मक - बाळासाहेब थोरात
- 2:49 PM- आम्ही आज उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली - बाळासाहेब थोरात
- 2:47 PM - हॉटेल ट्रायडंट मधील बैठक संपली, काँग्रेसचे सर्व नेते रवाना
- 2.38 PM - काँग्रेस नेत्यांची हॉटेल ट्रायडंट मधील बैठक संपली
- 2.15 PM - चर्चा योग्य दिशेने सुरु आहे, योग्यवेळी निर्णय सर्वांना कळेल - उद्धव ठाकरे
- 12.45 PM - शिवसेना नेते संजय राऊत यांना लिलावतीमधून मिळाला डिस्चार्ज
- 12.42 PM - सेनेसोबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आपापल्या प्रत्येकी पाच नेत्यांची समिती केली गठीत
*राष्ट्रवादी काँग्रेसची 5 नेत्यांची समिती गठीत*
- जयंत पाटील
- छगन भुजबळ
- अजित पवार
- नवाब मलिक
- धनंजय मुंडे
*काँग्रेसचे समिती गठित*
- बाळासाहेब थोरात
- अशोक चव्हाण
- पृथ्वीराज चव्हाण
- माणिकराव ठाकरे
- विजय वडेट्टीवार
12.40 PM - हॉटेल ट्रायडंटमध्ये शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांची बैठक सुरू
12:10 PM - विधान भवन येथून - शरद पवार यांच्यासह अजित पवार, जयंत पाटील हे सिल्वर ओक बंगल्यावर निघाले
12:09 PM - निश्चिंत राहा.. लवकरच आपले सरकार येईल; शेतकऱ्यांच्या मदत करण्याचेही शरद पवारांचे आमदारांना आवाहन
राज्यातील शेतकरी अडचणीत आला असून आपापल्या मतदारसंघात जाऊन प्रत्येक आमदारांनी शेतकऱ्यांना मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे
11:35 AM - विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपसभापती नीलम गोरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, शरद पवार, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, खासदार सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व आमदारांनी प्रमुख नेते यांनी वसंतदादा पाटील यांच्या विधानसभेत असलेल्या पुतळ्याला आदरांजली वाहिली.
राष्ट्रवादीकडून पाच जणांची समिती गठीत करण्यात आली असून तशी समिती काँग्रेसकडून समिती गठित केली जात आहे - अजित पवारकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे निर्णय घेऊन पुढील बैठका केव्हा होतील हे स्पष्ट करतील - अजित पवारआमचा प्रयत्न लवकरात लवकर बैठका सुरू होऊन हा प्रश्न सोडविण्याचा - अजित पवार
11.40 AM - जयपूरहून काँग्रेस आमदारांची पत्रकार परिषद
11.35 AM - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लता मंगेशकर यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या
11.35 AM - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी लिलावतीमध्ये दाखल
मानिकराव ठाकरे, विश्वजीत कदम अशोक चव्हाण यांची देखील उपस्थिती
11.28 AM - राष्ट्रवादीची बैठक संपली, मित्र पक्षाबाबत एकवाक्यता ठेवणार,
चर्चेतून मार्ग काढून शिवसेनेसोबत काय निर्णय घ्यायचा ते ठरवणार - अजित पवार
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आधी बैठक होणार, त्यानतंर शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा करणार
आमचा जाहीरनामा एकत्र आहे. तर शिवसेनेचा वेगळा आहे. त्यामुळे आम्ही आधी आमच्या मित्र पक्षासोबत चर्चा करणार आणि मग शिवसेनेबाबत चर्चा करणार - अजित पवार
10:00 AM - राष्ट्रवादीने आज पुन्हा आपल्या आमदारांची बोलावली बैठक
- १० वाजता सुरू होणाऱ्या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि वरिष्ठ नेते उपस्थित राहून करणार मार्गदर्शन
- या बैठकीत प्रामुख्याने सत्ता स्थापन करण्यासाठी आणखी मते जाणून घेतली जाणार
- राज्यात निर्माण झालेल्या राजकीय आणि दुष्काळाच्या परिस्थितीवर आमदारांना आपापल्या मतदारसंघात जाऊन काम शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काम करण्याच्या दिल्या जातील सूचना
- याशिवाय भाजपकडून संभावित फोडाफोडीचे राजकारण होऊ शकते, त्यासाठी सर्व आमदारांना अलर्ट राहण्याच्या सूचना या बैठकीत दिल्या जाणार आहेत....10.05 - शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर आज होणार सुनावणी; राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याच्या विरोधात दाखल आहे याचिका.
10.00 AM - काँग्रेसचे ४४ आमदार आज जयपूरहुन महाराष्ट्रात परतणार आहेत. 12:30 वाजता जयपूरहुन निघणार, 5 दिवसांपासून होते जयपूरमध्ये वास्त्वय
9:58 AM - उद्धव ठाकरेंनी घेतली काँग्रेस नेत्यांची भेट, पाठिंबा मिळविण्यासाठी चर्चा पुढे सुरूच