ETV Bharat / state

आज.. आत्ता.. सकाळी ९ वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर... - mumbai university exam

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराची आज सांगता होत आहे. पाचव्या टप्प्यात ७ राज्यांमधील ५१ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसची दुष्काळासह निवडणुकीतील कामकाजा विषयी आढावा बैठक होत आहे. दुसरीकडे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आप पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या काँग्रेससोबत जाण्याच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या एफवाय बीकॉमच्या परीक्षा रद्द झाल्याचा चुकीचा मेसेज व्हायरल होत होता. यावर खुलासा देत विद्यापीठाने परीक्षा नियोजित वेळेत होणार असल्याचे जाहीर केले. औरंगाबादमध्ये अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली
author img

By

Published : May 4, 2019, 9:01 AM IST

देशभरातील ५व्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या ५ व्या टप्प्यातील मतदानप्रक्रियेच्या प्रचार तोफा आज (शनिवार) संध्याकाळी थंडावणार आहेत. पाचव्या टप्प्यात ७ राज्यांमधील ५१ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यात उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यांचा समावेश आहे. यात उत्तर प्रदेशातील अत्यंत महत्त्वाच्या अमेठी आणि रायबरेली मतदारसंघांमध्येही मतदान होणार आहे.

(सविस्त वृत्त -http://bit.ly/2IV7LpO)

मुंबईत आज राष्ट्रवादीची बैठक, दुष्काळासह निवडणुकीतील कामकाजाचा घेणार आढावा

मुंबई - राज्यातील दुष्काळाची परिस्थ‍िती आणि नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही बैठक बोलावली असून राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसह जिल्हाप्रमुखांना या बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

(सविस्तर वृत्त - http://bit.ly/2GZgrct)

सत्ता आणि पैशासाठी केजरीवाल काँग्रेससोबत जाऊ पाहताहेत - अण्णा हजारे

अहमदनगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल यांचा आप पक्ष काँग्रेससोबत निवडणुका लढवणार असल्याच्या येत असणाऱ्या बातम्यांवर अण्णा नाराज आहेत.

(सविस्तर वृत्त - http://bit.ly/2XZh0Jc)

तावडेंच्या नावावर पसरवले जाणारे 'ते' ट्विट चुकीचे, परीक्षा वेळेतच - मुंबई विद्यापीठ

मुंबई - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या नावाने बनावट ट्विट तयार करून आज होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या एफवाय बीकॉमच्या परीक्षा या रद्द झाल्याचा मेसेज फिरत असून त्यावर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुंबई विद्यापीठाने केले आहे.

(सविस्तर वृत्त -http://bit.ly/2Wmsnuk )

औरंगाबादेत अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन अत्याचार

औरंगाबाद - वडोद बाजार येथील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडिता कुटुंबीयांसोबत औरंगाबादला लग्न समारंभात आली असताना हा प्रकार घडला. याप्रकरणी जिन्सी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. संतोष रामदास गायकवाड (२६ रा. मुर्शीदाबादवाडी, फुलंब्री) असे आरोपीचे नाव आहे.

(सविस्तर वृत्त - http://bit.ly/2vAn1jj )

Intro:Body:

आज.. आत्ता.. सकाळी ९ वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर...

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराची आज सांगता होत आहे. पाचव्या टप्प्यात ७ राज्यांमधील ५१ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसची दुष्काळासह निवडणुकीतील कामकाजा विषयी आढावा बैठक होत आहे. दुसरीकडे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आप पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या काँग्रेससोबत जाण्याच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या एफवाय बीकॉमच्या परीक्षा रद्द झाल्याचा चुकीचा मेसेज व्हायरल होत होता. यावर खुलासा देत विद्यापीठाने परीक्षा नियोजित वेळेत होणार असल्याचे जाहीर केले. औरंगाबादमध्ये अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

देशभरातील ५व्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

नवी दिल्ली - आज (शनिवार) संध्याकाळी देशभरातील ५ व्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. पाचव्या टप्प्यात ७ राज्यांमधील ५१ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यात उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यांचा समावेश आहे. यात उत्तर प्रदेशातील अत्यंत महत्त्वाच्या अमेठी आणि रायबरेली मतदारसंघांमध्येही मतदान होणार आहे. (सविस्त वृत्त -http://bit.ly/2IV7LpO)

मुंबईत आज राष्ट्रवादीची बैठक, दुष्काळासह निवडणुकीतील कामकाजाचा घेणार आढावा

मुंबई - राज्यातील दुष्काळाची परिस्थ‍िती आणि नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही बैठक बोलावली असून राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसह जिल्हाप्रमुखांना या बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (सविस्तर वृत्त - http://bit.ly/2GZgrct)

सत्ता आणि पैशासाठी केजरीवाल काँग्रेससोबत जाऊ पाहताहेत - अण्णा हजारे

अहमदनगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल यांचा आप पक्ष काँग्रेससोबत निवडणुका लढवणार असल्याच्या येत असणाऱ्या बातम्यांवर अण्णा नाराज आहेत. (सविस्तर वृत्त - http://bit.ly/2XZh0Jc)

तावडेंच्या नावावर पसरवले जाणारे 'ते' ट्विट चुकीचे, परीक्षा वेळेतच - मुंबई विद्यापीठ

मुंबई - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या नावाने बनावट ट्विट तयार करून आज होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या एफवाय बीकॉमच्या परीक्षा या रद्द झाल्याचा मेसेज फिरत असून त्यावर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुंबई विद्यापीठाने केले आहे. (सविस्तर वृत्त -http://bit.ly/2Wmsnuk )

औरंगाबादेत अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन अत्याचार

औरंगाबाद - वडोद बाजार येथील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडिता कुटुंबीयांसोबत औरंगाबादला लग्न समारंभात आली असताना हा प्रकार घडला. याप्रकरणी जिन्सी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. संतोष रामदास गायकवाड (२६ रा. मुर्शीदाबादवाडी, फुलंब्री) असे आरोपीचे नाव आहे. (सविस्तर वृत्त - http://bit.ly/2vAn1jj )

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.