मुंबई - राज्य मंत्रिमंडळातील नवीन मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत (Ajit Pawar Portfolio) आजच निर्णय होण्याचे संकेत मिळत आहेत. नवीन मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे. त्यांची सही झाली की थोड्याच वेळात याबाबत घोषणा केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Cabinet Portfolio) यांनी दिली आहे. त्यामुळे कोणाला कोणते खाते मिळेल याबाबतचा सस्पेन्स मिटणार आहे.
निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात - खातेवाटप संदर्भाचा निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार हा मुख्यमंत्री यांना असतो. तसा निर्णय मुख्यमंत्री घेतील. राज्यपालांकडे सदर यादी पाठवली आहे. नावे जाहीर होताच मंत्री हे आपापली जबाबदारी घेतील आणि कामाला सुरुवात करतील, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच सहकार खाते आपल्याकडे येणार का? या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले की, माध्यमांमध्ये अशा प्रकारचे अंदाज वर्तवले जातात. त्यानंतर चर्चा होतात. मात्र, खातेवाटपाबाबत सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. प्रसारमाध्यमांनी देखील खरे मांडण्याचे काम करावे, असे आवाहनही अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना केले आहे.
एकोप्याने काम करणार- तीन पक्षाचे मिळून आपण सरकार चालवत आहोत. त्यामुळे सर्वांनी मिळूनच काम करावे लागते. त्यामुळे तशा प्रकारची मानसिकता आम्ही केलेली असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवार आणि विधानसभा अध्यक्ष यांची भेट - सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष यांना आम्ही दिलेल्या निर्णयाच्या आधारे महाराष्ट्रातील आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्या आणि दोन आठवड्यात अहवाल सादर करा, असे सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने निर्देश दिले आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आहे. त्यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा देखील झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टाचे निर्देशादरम्यान अजित पवारांनी विधानसभा अध्यक्षांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.
तडजोड करूनच काम करावे - शिवसेना भाजपात राष्ट्रवादी सामील झाल्यामुळे महायुती सरकारचा गाडा सुरळीत चालवण्यासाठी तिन्ही पक्षांना खातेवाटपावरून तडजोड करूनच काम करावे लागणार आहे, अशी प्रतिक्रियाही अजित पवार यांनी दिली आहे. शिंदे गट अस्वस्थ, भाजपामध्ये मंत्रिपदावरून नाराजी आणि राष्ट्रवादीमध्ये ज्येष्ठांना मंत्रिपदाचा अनुभव या सर्व गोष्टी त्या त्या पक्षाच्या वरिष्ठांना समजूतदारपणे हाताळाव्या लागणार आहेत, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
हेही वाचा -
- Advice To MLAs : अजित पवार गटाशी जुळवून घ्या... शिंदे - फडवणीस यांचा आमदारांना कानमंत्र
- Raj Thackeray Konkan visit : फोडाफोडीचे राजकारण आम्हाला मान्य नाही, राज ठाकरेंचा भाजपला टोला
- Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरींच्या धमकीचे धागेदोरे थेट लष्कर-ए-तोयबापर्यंत! मास्टमाईंडला अटक करण्याकरिता पोलीस बेळगावला रवाना