मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी (Gujarat Assembly elections) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील आपली कंबर कसली असून या निवडणुकीच्या प्रचारासाठी हे पक्षाने 31 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) हे वरिष्ठ नेत्यांसह आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचाराचे नेतृत्व करतील, अशी घोषणा पक्षाने सोमवारी केली. या 31 स्टार प्रचारकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, प्रफुल पटेल आणि फौजिया खान यांच्यासह इतर नेत्यांचा देखील समावेश (campaigners of NCP for Gujarat Assembly elections) आहे.
महाराष्ट्रातून 31 स्टार प्रचारक : गुजरात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तीन जागांवर आपली उमेदवार जाहीर केले आहेत. आनंद तालुक्यातील उमरेथ विधानसभा मतदारसंघ, नरोडा मतदार संघ आणि देवगड बारिया या तीन मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने आपले उमेदवार दिली असून या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातून 31 स्टार प्रचारक जाणार (campaigners for Gujarat Assembly elections) आहेत.
पोरबंदरची जागा भाजपकडे आहे, तर कुतियाना ही जागा गुजरातच्या लेडी डॉन (गॉड मदर) यांचा मुलगा कंधाल जडेजा यांनी 10 वर्षांपासून ताब्यात ठेवली आहे. कांधल जडेजा हे गुजरातमधील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार होते. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने स्वतंत्र लढले होते, तरीही कांधल जडेजाने भाजपचा मोठ्या फरकाने पराभव केला. यावेळी राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. त्यात राष्ट्रवादीला तीन जागा मिळाल्या आहेत. त्यात कॉटेजचा समावेश नाही. नाराज झालेल्या कांधल जडेजा यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे.
गुजरातच्या राजकीय रणधुमाळीत प्रचार : गुजरातमध्ये झालेल्या 2017 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पोरबंदर तालुक्यातील मतदारसंघातून केवळ एक उमेदवार निवडून आला होता. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन उमेदवारांपैकी सर्व उमेदवार निवडून आणण्याची तयारी पक्षाने केली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह 31 स्टार प्रचारक गुजरातच्या राजकीय रणधुमाळीत प्रचार करणार आहेत. गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार असून एक आणि पाच डिसेंबरला मतदान होईल, तर आठ डिसेंबरला गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागणार (Gujarat Assembly Elections 2022) आहेत.
दोन टप्प्यात निवडणुका : पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष काँग्रेससोबत युतीचा भाग म्हणून उमरेठ (जि. आनंद), नरोडा (अहमदाबाद) आणि देवगड बारिया (दाहोद जिल्हा) या तीन जागा लढवणार आहे. 2017 च्या गुजरात निवडणुकीत, पोरबंदर जिल्ह्यातील कुतियाना विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेला कंधल जडेजा हा एकमेव राष्ट्रवादीचा उमेदवार होता. गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात निवडणुका होणार असून, 8 डिसेंबरला मतमोजणी होणार (Gujarat elections) आहे.