ETV Bharat / state

मुंबईत मद्यविक्रीला परवानगी; पण 'या' नियमांसह, जाणून घ्या... - liquor selling news

मद्यविक्री करण्यास सरकारनं सशर्त परवानगी दिली. तरीही खबरदारीसाठी मुंबई शहर, उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी मद्यविक्रीबाबतचा आदेश काढला आहे. त्यातील नियमांनुसार मद्यविक्री करता येणा आहे.

मुंबईत मद्यविक्रीला परवानगी
मुंबईत मद्यविक्रीला परवानगी
author img

By

Published : May 5, 2020, 8:03 AM IST

मुंबई - लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात 17 मेपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. मात्र, लॉकडाऊन वाढवताना सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. यात मद्यविक्रीवरील निर्बंधही कमी झाले आहेत. मद्यविक्रीतून कंटेनमेंट झोनला वगळण्यात आले आहे. कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम राहणार आहेत. त्यामुळे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर भागात मद्यविक्रीवर निर्बंध असणार आहेत, असं पत्र मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केले आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मद्यविक्री करता येणार आहे.

अशी होईल मद्यविक्री -

- दुकानांसमोर 5 पेक्षा अधिक ग्राहक असू नये -

- दोन ग्राहकांमध्ये किमान 6 फूट अंतर बंधनकारक

- सहा फूटांवर वर्तुळ आखणे बंधनकारक -

- संबंधित परवानाधारकाने कामगार, ग्राहकांची थर्मल स्कॅनिंग करावे

- सर्दी, खोकला व ताप असणाऱ्यांना दुकानात प्रवेश देवू नये

- दोन तासांनी दुकान परिसर निर्जंतूकीकरण करणे

- ग्राहकांसाठी हॅण्ड सॅनिटायझर मुबलक प्रमाणात द्यावा

- किरकोळ मद्यविक्री दुकानांमध्ये नियम पाळणे बंधनकारक

- सीलबंद मद्यविक्री सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत राहतील

- मद्य बाळगणे, खरेदी करण्याच्या क्षमतेचा भंग होवू नये

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.