मुंबई - मुंबईतील किन्नर समाजातील सदस्य आज विक्रोळी पश्चिम येथील लिटल फ्लॉवर स्कूलमध्ये दुपारी ४ च्या सुमारास योगा केले. आम्ही ही मानव आहोत समाजाने आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, यासाठी आम्ही शासनाच्या प्रत्येक कार्यात सहभागी होत असतो. असे किन्नर समाजातील योग करणारे बहुतांश सदस्य यावेळी आपले मत व्यक्त करीत होते.
आज आंतरराष्ट्रीय योग दिन जगासह संपूर्ण देशभर होत आहे. सकाळपासून विविध संस्था, शासकीय कार्यालय, शैक्षणिक संस्था यामध्ये आज योग दिन मोठ्या उत्साहात झाला. योग दिनाच्या निमित्ताने आज विक्रोळी पश्चिममध्ये किन्नर समाजातील सदस्य एकत्र येऊन योगा केला. शरीर निरोगी ठेवण्यात योगाचे काय महत्त्व काय असतात हे किन्नर सदस्यांना सांगण्यात आले. योग रोज केले तर मन प्रसन्न, शांत राहते असे सांगण्यात आले. उत्तम प्रकारे योग करणाऱ्यांना दररोज योग करण्यासाठी चटई भेट देण्यात आली.
किन्नर माँ संस्थापक सलमा खान म्हणाले, आम्ही मुंबईतील किन्नर सदस्य एकत्र येत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व बाबा रामदेव यांच्या कार्यात आम्हीही मानव म्हणून सहभागी झालो आहोत.आमच्यावर होणारे अन्याय कमी झाले पाहिजेत. शासनाने आमच्या मागण्या मान्य करून न्याय दिला पाहिजे.आम्ही आज खासगी शाळेत योग करीत आहोत.आम्हाला ही वाटते की, आपण कुटुंबातील सर्व सदस्य सोडून आज वेगळे आहोत.आमच्या मागण्या शासन दरबारी पडून आहेत. आम्हाला हक्काची राहण्यासाठी जागा मिळावी. त्या जागेवर जेणेकरून आम्ही योग कायम करत शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करू, असे म्हणाले.