मुंबई : शहरातील गोरेगाव पूर्वेत आरे कॉलनी परिसरामध्ये बिबट्याने पुन्हा एका महिलावर हल्ला केला आहे. आरे कॉलनी आदर्श नगर परिसरामध्ये राहणारी संगीता गुरव काल संध्याकाळी घरी जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केल्याची ( Leopard Attacked on Woman ) घटना घडली. बिबट्याचा या हल्ला मध्ये संगीता गुरव यांना डोक्यामध्ये मोठा जखम असून सध्या संगीता गुरव यांच्यावर ट्रामा केअर रुग्णालय मध्ये उपचार सुरू आहे.
बिबट्याच्या यापूर्वीच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू - दिवाळीच्या दिवशी आरे कॉलनी 15 नंबर युनिटमध्ये बिबट्याने एक दीड वर्षाची मुलीवर हल्ला केला होता त्यामध्ये मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.या घटनेनंतर बोरिवली वन विभागाचे टीम ॲक्शन मोड मध्ये येऊन दोन बिबट्यांना पिंजरा लावून ट्रॅप केले होतं.
नागरिकांमध्ये भीतेचे वातवरण - सध्या आरे कॉलनी परिसरामध्ये आठ ते दहा बिबट्याचा वावर असल्यामुळे आरे कॉलनी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी पाडे आणि वस्ती असल्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे