मुंबई: आजवर संबंधित लोकप्रतिनिधींकडून वारंवार मारहाण, धमक्या देण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. दोषींवर मोक्का लावावा, अशी मागणी दानवे यांनी केली. भाजपचे सदस्य प्रवीण दरेकर, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मागणीचे समर्थन करत, संबंधित आमदाराच्या गुन्हेगारीचा पाढा वाचला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा मुद्दा अधिवेशन काळात मांडत आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून मागील चार महिन्यांत शिवसैनिकांवर वेगवेगळे गुन्हे, मारहाण अशा अनेक घटना घडल्या आहेत. पोलिसांनी एकांकी भूमिका घेतल्याची अनेक उदाहरण समोर आली. मागील आठवड्यात एका लोकप्रतिनिधीचा व्हिडिओ व्हायरल प्रकरणी, अनेकांना अटक केली.
काय आहे प्रकरण? शिंदे सेनेच्या लोकप्रतिनिधीने 55 कार्यकर्त्यांकडून बिबीशन वारे या भाजपच्या एका कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेचे सीसीटीव्ही उपलब्ध आहेत. मारहाण करणाऱ्यांच्या हातात शस्त्रे होती. सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये विविध गुन्हे दाखल असलेले गुन्हेगार आहेत. आशिष नायर हा नामचिन गुन्हेगार म्हणून ओळखला जातो. आमदाराच्या मुलाचा ड्रायव्हर सुद्धा या गुन्ह्यात सामील आहे. संबंधितांवर 360 गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी केली. पालिकेच्या रुग्णालयात जखमीला दाखल करुन घेतले नाही. पोलीस, रुग्णालय प्रशासनावर एवढा मोठा दबाव होता. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. संबंधितांवर मोक्का लावावा आणि कार्यवाही संदर्भात निवेदन करावे, अशी मागणी दानवे यांनी परिषदेत केली.
तर अधिकाऱ्याला निलंबित करा: भाजपचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी, मुद्द्याला पाठिंबा दिला. विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेली वस्तुस्तिथी खरी आहे. भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून जीवघेणा हल्ला होत असेल तर प्रतिनिधी कोण आहे, हे बघण्यापेक्षा त्या अशा प्रवृत्ती ठेचून काढायला हव्यात. रुग्णालयात उपचार करण्यास नकार देणाऱ्या अधिष्ठाता आणि मेडीकल ऑफिसरला तात्काळ निलंबन करावे. तसेच सर्व प्रकरणाची चौकशी करावी. तसेच 55 लोकांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी केली.
नीलम गोऱ्हे यांचे निर्देश: प्रकरण गंभीर असून गृह विभागाकडून चौकशीचे आदेश दिले आहेत. अहवाल आल्यावर कारवाई केली जाईल. हल्लेखोर आणि कामांत कसूर करणाऱ्यांवर कठोर केली जाईल, असे स्पष्टीकरण मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. तर संबंधित लोकप्रतिनिधी बाबत आतापर्यंत तीन घटना समोर आल्या आहेत. भाजप पदाधिकाऱ्याला मारहाणीच्या पाठीमागे कोणी गुन्हेगार आहेत. मारहाण करणाऱ्या 35 लोकांना प्रोत्साहन देणाऱ्या सुत्रधाराला अटक करा, असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले. दहिसर येथील व्हिडीओचे प्रकरण मनस्ताप देणारे आहे. मॉर्फ व्हिडीओ बाबत एसआयटी नेमली आहे. अधिवेशन संपण्यापूर्वी त्यातील सत्यता समोर यावी. निराधार लोकांना यात अटक केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी लोकप्रतिनिधी असे प्रकार घडत असतील गंभीर बाब आहे. संबंधित लोकप्रतिनिधीबाबत वारंवार सतत तक्रारी आल्या आहेत. त्यांनी कोणा कोणाला धमक्या दिल्या आहेत. त्या सर्व प्रकरणाची चौकशी उद्यापर्यंत अटक करावे, असे निर्देश नीलम गोऱ्हे यांनी दिले.
हेही वाचा: Old Pension Scheme Strike Update : सरकार जुनी पेन्शन लागू करणार; संपकऱ्यांची संप मागे