पुणे - काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) हे संभाजीनगर दौऱ्यावर होते. यावेळी ठाकरे हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या या दौऱ्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील नेत्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात ( Criticism on Uddhav Thackeray from Shinde group ) आली. यावर शिवसेना नेत्या तसेच विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी ( Legislative Council Deputy Speaker Dr. Neelam Gorhe ) प्रतिउत्तर दिलं आहे. त्या म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रमाणे कोरोना काळात जनतेचा मन जिंकल त्याप्रमाणे जनतेला ते आपल्या घरातील वाटतात ते कोणतेही नेते वाटत नाही. जे एवढे दिवस उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत होते की बांधावर गेले पाहिजे तेच लोक आज उद्धव ठाकरे बांधावर गेल्याने ते उघडे पडले आहे. तसेच आज जे त्यांच्या प्रकृतीबाबत टिका करत आहे. त्यांना मी दिवाळी निमित्त एवढंच सांगेल की बुरे नजर वाले तेरा मुह काला असं यावेळी गोऱ्हे म्हणाल्या.
शेतीच नुकसान - परतीच्या पावसाने शेतीच मोठ नुकसान झालं आहे. शेतीला आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना पुरेशी मदत शासनाकडून मिळत नाही. यामुळे ते हवालदिल झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी संभाजीनगर जिल्ह्यात भेट दिली आहे. स्थानिक शेतकर्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी ही भेट दिली. एक वेगळ्या पद्धतीचा दिलासा, शेतकर्यांना एक आत्मविश्वास मिळवून देण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा फार मोठा सहभाग आणि अनुभव मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्राला परिचित आहे. यापूर्वी अनेकदा त्यांनी शेतकर्यांशी प्रत्यक्ष बांधावर जाऊन संवाद साधलेला महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आम्ही स्वत: देखील अनेकदा याचे साक्षीदार आहोत. यासोबतच राज्याचे प्रशासन, राज्यकर्ते यांची देखील कामाची गती उद्धव ठाकरे यांच्या सहभागाने वाढत आहे असा अनुभव आहे अस, यावेळी गोऱ्हे म्हणाल्या.
राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या शेतकर्यांवर आलेल्या या संकटात ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या अगोदर उद्धव ठाकरे महिला शेतकर्यांच्या मागे भावाप्रमाणे उभे राहत आहेत. त्यांचे सर्व समावेशक नेतृत्व शेतकरी आणि राज्यातील जनतेला दिलासा देणारे आहे. या अर्थाने आजच्या त्यांच्या या दौर्याला राज्यातील जनतेच्या मनात विशेष महत्व आहे हे नाकारून चालणार नाही.अस देखील यावेळी गोऱ्हे म्हणाले.