ETV Bharat / state

Action by Valid Metrology: छापील किंमतीपेक्षा जास्त दराने वस्तू विकल्यास वैध मापनशास्त्र विभाग कारवाई करणार - शीतपेय विक्री

आता उन्हाळा सुरू झालाय, सर्वांचा घसा कोरडा पडला की, आपोआप सर्वांचे पाय शीतपेय पिण्याकडे वळतात. मात्र, फ्रीजमध्ये स्टोअर केलेल्या शीतपेयाची विक्री ही वाढीव दराने काही दुकानदार करतात. हे चित्र मुंबईत सर्रास पाहायला मिळतं. दुकानदाराला वाढीव पैशांविषयी विचारणा केली तर ते फ्रीजचं भाडं असल्याचं ग्राहकाला उत्तर देतात. वैध मापन शास्त्र विभागाकडून अशा दुकानदारांवर कारवाईचा बडगा उचलणार असल्याने अशा वाढीव दराने वस्तू विकणाऱ्या दुकानदाराने वेळीच सावध होणं गरजेचं आहे.

File Photo
Action by Valid Metrology
author img

By

Published : Mar 21, 2023, 7:37 PM IST

मुंबई : वैध मापन शास्त्र विभागाकडून छापील किमतीपेक्षा जास्त दराने वस्तू विकणाऱ्या दुकानांवर अथवा असता पानांवर कारवाईचा वेग वाढवला आहे. वैध मापन शास्त्र विभागाकडून पथक ग्राहकाच्या वेशात दुकानात जाऊन पाहणी करून कारवाई करतात. अशा प्रकारे गेल्या वर्षभरात 491 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या दुकानात येणारी व्यक्ती तपास अधिकारी पथकातील निघाल्यास तुम्हाला कारवाईला सामोरे जाऊ लागू शकते.

आस्थापनांवर करडी नजर : राज्याचे वैध मापन शास्त्र विभागाचे अपर पोलीस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले की, अवघ्या पाण्याच्या बाटलीपासून ते इतर वस्तूंवरील छापील किंमत पाहून ग्राहकाने वस्तू खरेदी करणं महत्त्वाचं आहे. ग्राहकांनी जागरूक राहून खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तूचे प्रमाण किंमत पॅकेजिंग योग्य आहे की, अयोग्य आहे याची पडताळणी करणे हा ग्राहकांचा हक्क आणि अधिकार आहे. आमची सर्व दुकान आणि आस्थापनांवर करडी नजर असून ग्राहकांवर अन्याय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

कुठे जायचं तक्रार करायला? : मुंबईतील धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये जर तुम्ही घाईघाईत वस्तू खरेदी करत असाल, तर थोडं लक्ष देऊन एखाद्या वस्तूची खरेदी करा. पाण्याची बॉटल असो किंवा शीतपेय असो त्या बॉटलवरील छापील किमतीपेक्षा जास्त किंमत दुकानदाराने आकारली तर कुठे जायचं तक्रार करायला? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी कुठेही जायची गरज नाही. ग्राहकांना याबाबत तक्रार करायची असल्यास ते (022-22622022) या क्रमांकावर किंवा व्हाट्सअप क्रमांक (9869691666) त्या क्रमांकावर थेट तक्रार करण्याचे आवाहन वैधमापन शास्त्र विभागाने केले आहे.

8 हजार 297 जणांवर कारवाई : ग्राहकांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी वैध मापन शास्त्र विभागाच्या पथकाकडून कारवाईचा बडगा मोठ्या प्रमाणावर उचलण्यात आला आहे. गेल्यावर्षी म्हणजेच 2022 मध्ये छापील किमतीपेक्षा जास्त दराने वस्तू विकणाऱ्या 491 लोकांवर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे शॉर्ट डिलिव्हरी प्रकरणी 203 आणि कमी माप करणे त्याचप्रमाणे अन्य तक्रारिंप्रकरणी 8 हजार 297 जणांवर कारवाई करण्यात आली.

वैधमापन शास्त्र विभागाने कारवाई : 2020 मध्ये संपूर्ण वर्षभरात छापिल किमतीपेक्षा जास्त दराने वस्तू विकणाऱ्या 127 जणांवर तर शॉट डिलिव्हरी प्रकरणी 64 जणांवर कारवाई करण्यात आली होती. तसेच, अन्य तक्रारींअन्वये 2 हजार 86 सणांवर वैधमापन शास्त्र विभागाने कारवाई केली. तसेच, 2021 मध्ये जास्त दराने वस्तू विकल्या प्रकरणी 281 जणांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला तर शॉर्ट डिलिव्हरी प्रकरणे 142 जणांवर कारवाई करण्यात आली. ग्राहकांचे इतर तक्रारींवरून एकूण 3 हजार 565 जणांवर कारवाई केली असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा : आरएसएसच्या विरोधात वक्तव्य करणे भोवले, राहुल गांधींच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.