ETV Bharat / state

ऐका, अधिवेशनात कोणते नेते काय म्हणाले, एकाही आमदाराने शिवीगाळ केलेली नाही- फडणवीस - maharashtra legislative assembly

maharashtra assembly
maharashtra assembly
author img

By

Published : Jul 5, 2021, 10:42 AM IST

Updated : Jul 5, 2021, 5:30 PM IST

16:46 July 05

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ सरकारने आणली - राणा

  • शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ सरकारने आणली आहे.
  • ओबीसी,मराठा आरक्षण मिळाले नाही.
  • महाबीजने लोकांची फसवणूक झाली आहे. याची चौकशी झाली पाहिजे.
  • सरकारला शेतकरी, मराठा, ओबोसी समाजाचे काहीही पडलेले नाही.
  • सरकारच्या कामकाज पत्रिकेचा निषेध करतो.
  • कामकाज पत्रिका फाडत रवी राणा यांनी निषेध केला आहे.

15:26 July 05

माझा 'सामना' करण्याची ताकद शिवसेनेमध्ये नाही- आशिष शेलार

भास्कर जाधव आणि संजय कुटे यांच्यातील बाचाबाचीनंतर भाजपच्या विधानसभेतील 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले. यामध्ये आमदार आशिष शेलार यांचांही समावेश आहे. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेच्या सदस्यांनी येऊन धक्काबुक्की केली. हे सर्वांनी पाहिले. तालिबानी सरकारचा मी निषेध करतो, अशी टीका शेलार यांनी केली. तसेच माझा 'सामना' करण्याची ताकद शिवसेनेमध्ये नाही, असा टोलाही लगावला आहे. 

15:01 July 05

एकाही आमदाराने शिवीगाळ केलेली नाही- फडणवीस

अधिवेशनात गोंधळ घालणाऱ्या 12 आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन

  • ओबीसी आरक्षणासाठी बाराच काय, 106 आमदारांचं निलंबन केलं तरी मागे हटणार नाही
  • यापूर्वी अनेकदा सभागृहात बाचाबाची झाली, मात्र कुणाचेही निलंबन झाले नाही.
  • शिवी देणारे कोण होते हे सर्वांनी बघितले आहे
  • शिवसेनेच्या सदस्यांनी येऊन धक्काबुक्की केली
  • आशिष शेलारांनी सर्वांच्या वतीने भास्कर जाधव यांची माफी मागितली आणि विषय संपवून आम्ही बाहेर आलो.
  • त्यानंतर सरकारच्या मंत्र्यांनी आमचे आमदार सस्पेंड करण्यासाठी स्टोरी तयार केली.
  • मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर हे सरकार फेल ठरले आहे.
  • मराठा समाजाला फसविण्याचे काम सरकारकडून केले जात आहे.
  • मराठा आरक्षणावर राज्य सरकारचा ठराव म्हणजे, लग्न झालं नाही, मात्र पोराचं नाव ठरवून पाठविण्याचा प्रकार

12:04 July 05

राजकारणात मार्ग बदलतात, मात्र मैत्री कायम राहते - संजय राऊत

देवेंद्र फडणवीस म्हणाले की शिवसेनेसोबत आमची दुश्मनी नाही. मी देखील अनेक दिवसांपासून हेच म्हणत आहे. आम्ही काय भारत- पाकिस्तान थोडीच आहोत. भेटीगाठी होत असतात बातचीत होत असते. मात्र राजकीय दृष्ट्या आमचे रस्ते वेगळे झाले आहेत. फडणवीस यांचे देखील हेच म्हणणे आहे. आपण पाहिले असेल अमीर खान आणि किरण राव यांचे रस्ते वेगळे झाले मात्र मित्र कायम आहेत. सेम आमचे तसेच आहे. रस्ते वेगळे आहेत मात्र मैत्री कायम आहे. आमची मैत्री कायम राहील. मात्र याचा अर्थ हा नाही की, आम्ही सरकार बनवण्यासाठी जात आहोत. परिस्थिती आत्ता काय आहे आणि उद्या काय असेल याचे भविष्य कोणीच सांगू शकत नाही. माझ्यापेक्षा जास्त माहिती फडणवीसांकडे असते. या क्षणी महाराष्ट्रात जे सरकार आम्ही बनवले आहे, ते उत्तम सुरू आहे. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणा, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

11:01 July 05

राज्य सरकारला फक्त आदित्य ठाकरे, रोहित पवारांच्या भविष्याची चिंता- सातपुते

भाजप आमदार राम सातपुते यांचे विधानभवन परिसरात आंदोलन

आमदार राम सातपुते यांनी अधिवेशन सुरू होण्याआधीच विधानभवन परिसरात आंदोलन केले. एमपीएससी विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने राज्यसरकरच्या नातरकेपणामुळे आत्महत्या केली. राज्यसरकारला केवळ आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांच्या भविष्याची चिंता आहे. सामान्य विद्यार्थ्याने आत्महत्या केली तरी सरकारला काही काही देणेघेणे नाही, असा आरोप आमदार राम सातपुते यांनी केला आहे.

10:03 July 05

अधिवेशनात कोणते नेते काय म्हणाले; राजकारणात मार्ग बदलतात, मैत्री कायम राहते - राऊत

सदाभाऊ खोत यांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई - महाराष्ट्र विधिमंडळाचे आजपासून दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. आज, 5 जुलै आणि उद्या, 6 जुलै असे दोन दिवस हे अधिवेशन पार पडणार आहे. त्यामुळे विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळणार आहे. दोन दिवसांचे हे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. 

सदाभाऊ खोत यांची ठाकरे सरकारवर टीका

शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकार जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारने अधिवेशनातून पळ काढला आहे. तसेच सर्वात भीत्रा प्राणी हा ससा म्हटल्या जाते. मात्र, ससा हा भीत्रा नसून भीत्रे महाविकास आघाडी सरकार आहे. अशी टीका खोत यांनी केली आहे. पळाला रे पळाला कोण पळाला वाघ पळाला अशी घोषणा सदाभाऊ खोत यांनी दिली. 

Last Updated : Jul 5, 2021, 5:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.