आज अखेरचा दिवस: हे दिग्गज नेते दाखल करणार उमेदवारी अर्ज
मुंबई - लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान ११ एप्रिलला होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा (सोमवार) दिवस आहे. त्यामुळे या मतदार संघासाठी तिकीट मिळालेले सर्वच उमेदवार आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यात भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (सोलापूर-दुसरा टप्पा) यांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात राज्यातल्या वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम यासात लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. येत्या गुरुवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आज अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करतील.
रामटेक - रामटेकमधून शिवसेनेचे कृपाल तुमाने तर काँग्रेसचे किशोर उत्तमराव गजभिये हे आज उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.
नागपूर -
नागपूर - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना नागपुर मतदार संघातूनअर्ज दाखल केला आहे.शहरातील संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता गडकरींनी मिरवणुक काढली होती.त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत. तर काँग्रेसचे नाना पटोले यांनीही आज त्याचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.त्याचप्रमाणे बसपाचे उमेदवार जमाल मोहम्मदही यांनीही आज दुपारी १ वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. वाचा सविस्तर
भंडारा- गोदिया - या मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार माजी मंत्री नाना पंचबुद्धे आज अर्ज भरणार आहेत. रविवारीच त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर भाजपचे सुनिल मेंढे हे देखील आज त्याचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
चंद्रपूर-
चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून भाजप नेते हंसराज अहिर हे स्थानिक आमदार आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत जाऊन अर्ज भरणार आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार शिवसेनेतून आलेले बाळू धानोरकर हे आज अर्ज सादर करणार आहेत.
यवतमाळ- वाशिम-
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे यवमतमाळमधून निवडणूक लढविणार आहेत. तेही आज अर्ज भरणार आहेत. सलग तीन वेळा निवडून येणाऱ्या शिवसेनेच्या भावना गवळी यांना त्यांना टक्कर द्यावी लागणार आहे. यवतमाळ वाशिम मतदारसंघात काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे, शिवसेनेकडून भावना गवळी, Vba कडून प्रवीण पवार आणि प्रहारकडून वैशाली येंडे निवडणूक लढवत आहे.
वर्धा - वर्धा लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खा. रामदास तडस यांनी शुक्रवार दिनांक २२ मार्च, २०१९ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सोलापूर -(दुसरा टप्पा)- या मतदार संंघातही आज शिंदे,आंबेडकर हे अर्ज भरणार आहेत
सोलापूर मतदार संघासाठी दुसऱ्या टप्प्यामध्य मतदान होणार आहे. त्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे आज शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत, दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सुद्धा रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यही शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
नांदेड (दुसरा टप्पा)- अशोक चव्हाण आज भरणार उमेदवारी अर्ज
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, पीआरपी(कवाडे गट), रिपाइं (गवई गट), स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी या पक्षांचे उमेदवार अशोक चव्हाण हे उमेदवारी अर्ज सोमवार दाखल करणार आहेत. यावेळी महाआघाडीची मिरवणूक निघणार असून ही रॅली जुना मोंढा टॉवर - गुरुद्वारा चौक - महावीर चौक वजिराबाद मार्गे मुथ्था चौक - एस. पी. ऑफिस - कलामंदिर - शिवाजी नगर उड्डाण पुल-ज्योती सिनेमागृहच्या मार्गे गोकुळ नगर येथील इंदिरा गांधी मैदान येथे पोहचेल. तेथे सभा होऊन सांगता होणार, अशी माहिती काँग्रेसचे महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर आणि जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर यांनी दिली.
बीड (दुसरा टप्पा)-
बीडचे लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे आज उमेदवारी अर्ज भरत आहेत. तर विद्यमान भाजप खासदार प्रीतम मुंडे या देखील आज त्यांचा उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. यावेळी मंत्री पंकजा मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.