ETV Bharat / state

'हे सरकार संकुचित वृत्तीचं आहे, त्यामुळेच विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रण दिले नाही'

author img

By

Published : Mar 31, 2021, 4:07 PM IST

'विरोधकांना भूमिपूजन सोहळ्याला बोलवायला हवं होतं. बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी सर्वपक्षीय नेत्यांना बोलावणे गरजेचे आहे. बाळासाहेब हे शिवसेनेचे प्रमुख असले तरी राजकारणाच्या पलीकडे महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्याकडे पाहिलं आहे. बाळासाहेबांसारख्या लोकप्रिय नेतृत्व असलेल्या नेत्याच्या स्मारकाच्या कार्यक्रमाला सर्वांना बोलावलं गेलं असतं, तर कार्यक्रमाची उंची वाढली असती असे दरेकरांनी म्हटले आहे.

विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर
विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर

मुंबई - दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाला विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रण न दिल्यावरून प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. 'सरकारने कोरोनाचे कारण पुढे करत विरोधकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रण दिले नाही.' अशी टिका त्यांनी केली आहे.

..'म्हणून सरकारची बोलावण्याची इच्छा नाही'
प्रवीण दरेकर माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, 'विरोधकांना भूमिपूजन सोहळ्याला बोलवायला हवं होतं बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी सर्वपक्षीय नेत्यांना बोलावणे गरजेचे आहे. बाळासाहेब हे शिवसेनेचे प्रमुख असले तरी राजकारणाच्या पलीकडे महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्याकडे पाहिलं आहे. बाळासाहेबांसारख्या लोकप्रिय नेतृत्व असलेल्या नेत्याच्या स्मारकाच्या कार्यक्रमाला सर्वांना बोलावलं गेलं असतं, तर कार्यक्रमाची उंची वाढली असती. राज्य सरकारने कोव्हिडचे कारण पुढे करत हे कार्यक्रम ऑनलाईन केले आहे. मात्र वेगवेगळ्या कार्यक्रमांना राज्य सरकार परवानगी देत असते. पण या कार्यक्रमाला बोलण्याची इच्छा नसेल तर कोरोना किंवा अशी अनेक कारणे राज्य सरकारने विरोधी पक्षांना दिलेली आहे.' अशी टीका दरेकर यांनी केली आहे.

..'तर आनंद झाला असता'
बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचा वारसा पुढे नेणारे राज ठाकरे हे त्यांच्या घरातले असून सुद्धा त्यांना या कार्यक्रमाला बोलावले गेले नाही. तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्याकडून या स्मारकाची उभारणी केली जात आहे. त्यांचे सुद्धा निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव नाही. प्रश्न मानापमानाचा नाही तर मनोवृत्तीचा आहे. मला या कार्यक्रमाला बोलावले असते तर आनंद झाला असता. परंतु वरातीमागून घोडे नाचविण्यात मजा नाही.'अशी टीका प्रवीण दरेकर यांनी सरकारवर केली आहे.

हेही वाचा-बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे आज भूमिपूजन

हेही वाचा-शरद पवारांवर यशस्वी शस्त्रक्रिया, प्रकृती स्थिर; सुप्रिया सुळेंनी मानले डॉक्टरांचे आभार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.