ETV Bharat / state

ST Chakka Jam Andolan : ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांचे हाल; गुणरत्न सदावर्तेंनी दिली चक्का जामची हाक - Gunaratna Sadavarte On ST chakka jam

ST Chakka Jam : विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी याआधीही संप केला होता. त्यानंतर सरकारनं काही मागण्या मान्य केल्यानंतर दोन दिवसांत हे आंदोलन मागं घेण्यात आलं. पण, आता पुन्हा एकदा चक्का जामची (Chakka Jam Andolan) घोषणा देण्यात आली आहे. ही घोषणा कोणत्याही संघटनेकडून करण्यात आली नसून, नेहमी आपल्या विधानांमुळं चर्चेत राहणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्याकडून करण्यात आली आहे.

Gunaratna Sadavarte
गुणरत्न सदावर्ते
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 3:56 PM IST

माहिती देताना श्रीरंग बर्गे

मुंबई ST Chakka Jam Andolan : ऐन सणासुदीच्या (Diwali 2023) काळामध्ये लालपरीने प्रवास करणाऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. एसटी कष्टकरी जनसंघ या एसटी कामगार संघटनेचे सर्वेसर्वा गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्याकडून चक्का जामची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळं सणाच्या कालावधीत प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासोबतच एसटी महामंडळाचे देखील आर्थिक नुकसान होणार असल्याचं बोललं जातंय.

कामगारांनी स्वतःहून सहभागी व्हावे : गणेशोत्सवाच्या काळामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. राज्य सरकारच्या वतीनं एसटी कामगारांच्या बहुतेक मागण्या मान्य केल्यानंतर एसटी कामगारांनी संप मागे घेतला होता. आता पुन्हा सोमवारपासून विविध मागण्यांसाठी गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली दिवाळी सणाच्या तोंडावर एसटी कामगारांनी चक्का जाम आंदोलनात स्वतःहून सहभागी व्हावे, असं आवाहन सदावर्ते यांनी एसटी कामगारांना केलं आहे.

चक्का जाम आंदोलन : 'ई टीव्ही भारत'शी बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, कोणत्याही प्रकारचा संप वगैरे काही नाही. माध्यमांमध्ये वेगळ्या प्रकारे बातम्या येत आहेत. चक्का जाम (Chakka Jam) असणार आहे. सध्याच्या काळात महामंडळाच्या बसेसची काय परिस्थिती आहे ही सर्वांना माहित आहे. अनेक बसेस रस्त्यावर धावण्यायोग्य नाही, अनेक बसेसचे इन्शुरन्स नाही, एसटी महामंडळातील 85 टक्के बस या नादुरुस्त आहेत. आरटीओच्या नियमाप्रमाणे अनेक बसेस रस्त्यावर चालवण्यास योग्य नसल्याची माहिती समोर येत आहे. तसेच बस गाड्यांमधील वायरिंग व्यवस्थित केली जावी. सातवा वेतन लागू करावा. एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण तसेच राज्य सरकारच्या वतीनं कर्मचाऱ्यांना 48 टक्के महागाई भत्ता दिला आहे. त्यातील थकबाकी अद्याप मिळालेली नाही. थकबाकी लवकरात लवकर देण्यात यावी, अन्यथा सोमवारपासून एसटी महामंडळाची एकही गाडी रस्त्यावर धावणार नाही, त्या दिवसाचा पगार एसटी महामंडळाला द्यावाच लागेल.

गुणरत्न सदावर्ते यांची ऑडिओ क्लिप व्हायरल : गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखालील एसटी कष्टकरी जनसंघ संपाच्या तयारीला लागला असून, याविषयीं राज्यातील विविध जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत गुणरत्न सदावर्ते यांच्यातील बातचीत करणारी ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सातवा वेतन आयोग थकबाकी देणे, महागाई भत्ता देणे, महागाई भत्ताचा फरक देणे या मागण्या सरकार दरबारी मागितल्या पाहिजे. त्या एसटीकडे मागून काही फायदा नाही. सातवा वेतन मिळाला म्हणून ज्यांनी आझाद मैदानात जल्लोष केला तेच पुन्हा आता सातव्या वेतनाची मागणी करत आहे हे दुर्दैवी आहे. तसेच हे लोकांची फसवणूक करणार आहेत. तसेच विलीनीकरणाच्या मुद्द्यावर काही बोलायला तयार नाहीत. सदावर्ते आणि सरकारचं साटंलोटं आहे - श्रीरंग बर्गे, काँग्रेस सरचिटणीस

सदावर्ते यांच्या आवाहनाला प्रतिसाद? : याबाबत एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष शेखर चेन्ने यांनी अशी कोणत्याही प्रकारची संपाची नोटीस आपल्याला मिळाली नसल्याची माहिती दिली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या आवाहनाला एसटी कामगार आणि कामगार संघटना किती प्रतिसाद देते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या हिंसक आंदोलन प्रकरणी, गुणरत्न सदावर्ते यांची उच्च न्यायालयात याचिका
  2. Gunaratna Sadavarte News: गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनाची तोडफोड, मनोज जरांगे यांना अटक करण्याची सदावर्तेंची मागणी
  3. Gunaratna Sadavarte On Jarange Patil : जरांगे पाटील यांच्या सभेची गुणरत्न सदावर्तेंनी घेतली फिरकी, पवारांवरही निशाणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.