ETV Bharat / state

Lata Mangeshkar Passed Away : लता मंगेशकर यांच्या सारखे जगात दुसरे कोणी होऊ शकत नाही, चाहत्यांची प्रतिक्रिया - लता मंगेशकर यांच्या पार्थिवार अंत्यसंस्कार

लता मंगेशकरच्या निधनाची ( Lata Mangeshkar Passed Away ) वार्ता कळताच चाहत्यांना दुःख झाले. अनेकांनी आणि आपल्या आवडत्या गायिकेचे दर्शन घेण्यासाठी पेडर रोड येथील प्रभुकुंज या इमारतीबाहेर गर्दी करायला सकाळपासून सुरुवात केली. यावेळी लता मंगेशकर यांच्या रुपात साक्षात सरस्वतीनेच जन्म घेतला होता. लता मंगेशकर यांच्या सारखे केवळ भारतातच नाही तर जगातही कोणीच होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांच्या एका चाहत्याने दिली.

लता मंगेशकर
लता मंगेशकर
author img

By

Published : Feb 6, 2022, 3:38 PM IST

मुंबई - गानकोकिळा लता मंगेशकरच्या निधनाची ( Lata Mangeshkar Passed Away ) वार्ता कळताच चाहत्यांना दुःख झाले. अनेकांनी आणि आपल्या आवडत्या गायिकेचे दर्शन घेण्यासाठी पेडर रोड येथील प्रभुकुंज या इमारतीबाहेर गर्दी करायला सकाळपासून सुरुवात केली. यावेळी लता मंगेशकर यांच्या रुपात साक्षात सरस्वतीनेच जन्म घेतला होता. लता मंगेशकर यांच्या सारखे भारतातच नाही तर जगातही कोणीच होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांच्या एका चाहत्याने दिली.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले ( Lata Mangeshkar Passed Away ) आहे, त्या 92 वर्षाच्या होत्या. गेल्या 9 जानेवारीपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात ( Breach Candy Hospital Mumbai ) गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते.

लता मंगेशकर यांना 9 जानेवारील कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. 30 जानेवारीला लता मंगेशकर कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, शनिवारी (दि. 5 फेब्रुवारी) अचानक त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यामुळे देशभरातील चाहत्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती.

लता मंगेशकर यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी स्वत: रुग्णालयात जाऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. मात्र, रविवारी (दि. 6 फेब्रुवारी) सकाळी पावणे दहाच्या सुमारास लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संगीतातील एका युगाचा अंत झाला. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

सायंकाळी सहा वाजता होणार अंत्यसंस्कार - लता मंगेशकर यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी प्रभुकूंजवर आणण्यात आले आहे. त्यांच्यावर सायंकाळी सहा वाजता दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यासाठीची तयारी मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा - Journey of Lata Didi About Songs : भारताचा मानबिंदू लतादिदिंचा आवाज शांत झाला! दिदिंचा गाण्यांबद्दल हा प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.