मुंबई - गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना 28 दिवसांच्या उपचारानंतर अखेर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दीदींनी स्वतः सोशल मीडिया अकाऊंटवर ट्विट आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करुन चाहत्यांना ही माहिती दिली.
-
नमस्कार.पिछले 28 दिनोंसे मैं ब्रीच कैंडी हॉस्पिटल में थी। मुझे न्यूमोनिया हुआ था.डॉक्टर चाहते थे की मैं पूरी तरह से ठीक हो जाऊँ फिर घर जाऊँ,आज मैं घर वापस आगयी हूँ. ईश्वर, माई बाबा के आशीर्वाद और आप सब के प्यार,प्रार्थनाओं से मैं अब ठीक हूँ.मैं आप सब की हृदयसे आभारी हूँ.
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) December 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">नमस्कार.पिछले 28 दिनोंसे मैं ब्रीच कैंडी हॉस्पिटल में थी। मुझे न्यूमोनिया हुआ था.डॉक्टर चाहते थे की मैं पूरी तरह से ठीक हो जाऊँ फिर घर जाऊँ,आज मैं घर वापस आगयी हूँ. ईश्वर, माई बाबा के आशीर्वाद और आप सब के प्यार,प्रार्थनाओं से मैं अब ठीक हूँ.मैं आप सब की हृदयसे आभारी हूँ.
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) December 8, 2019नमस्कार.पिछले 28 दिनोंसे मैं ब्रीच कैंडी हॉस्पिटल में थी। मुझे न्यूमोनिया हुआ था.डॉक्टर चाहते थे की मैं पूरी तरह से ठीक हो जाऊँ फिर घर जाऊँ,आज मैं घर वापस आगयी हूँ. ईश्वर, माई बाबा के आशीर्वाद और आप सब के प्यार,प्रार्थनाओं से मैं अब ठीक हूँ.मैं आप सब की हृदयसे आभारी हूँ.
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) December 8, 2019
या पोस्टमध्ये दीदींनी आपल्याला न्यूमोनिया झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. त्यानंतर ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांची टीम आणि रुग्णालयातील कर्मचारी डोळ्यात तेल घालून माझी शुश्रूषा करत होते. अखेर त्यांना मी पूर्णपणे बरी झाली असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी मला घरी जाण्याची परवानगी दिली. मात्र, आता देवाच्या आणि माई बाबांच्या आशीर्वादाने मी पुन्हा घरी परत आले आहे.
माझी शुश्रूषा करणारे डॉक्टर, नर्स, रुग्णालय कर्मचारी यांची मी आभारी आहे. त्यासोबत मी लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वच चाहत्यांचे मी मनापासून आभार मानते.
दीदींनी हे ट्विट त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करताच अनेकांनी त्यावर त्यांना आराम करण्याचा आणि लवकर पूर्णपणे बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.