ETV Bharat / state

Manodhairya Yojna : गेल्या वर्षभरात 280 पीडितांना मिळाला मनोधैर्य योजनेचा आधार, वाचा सविस्तर... - मनोधैर्य योजना माहिती

बलात्कार, लैंगिक अत्याचार, जीवघेणा ऍसिड हल्ला अशा घटनांमध्ये पीडित असलेल्या अल्पवयीन मुली तसेच महिलांना राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेचा आधार मिळत आहे. गेल्या वर्षभरात मुंबईतील सुमारे 280 पीडितांना जवळपास एक कोटींची मदत करण्यात आली आहे. राज्यात घडलेल्या घटनांसाठी 2013 पासून मनोधैर्य योजना अंमलात आली.

sexual abuse victim
280 पीडितांना मिळाला मनोधैर्य योजनेचा आधार
author img

By

Published : Feb 5, 2023, 10:48 PM IST

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून मुंबईसह राज्यात महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. बलात्कार, लैंगिक अत्याचार, जीवघेणा ऍसिड हल्ला अशा घटनांमध्ये पीडित असलेल्या अल्पवयीन मुली व महिलांना राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेचा आधार मिळत आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदत दिली जाते. त्या अंतर्गत मुंबईतील सुमारे 280 पीडितांना जवळपास एक कोटींची मदत करण्यात आली आहे.

कसे मिळते अर्थसहाय्य : लैंगिक अत्याचार झाल्यास 2 ते 3 लाखांची आर्थिक मदत राज्य सरकारकडून दिली जाते. तसेच ऍसिड हल्ल्यात चेहरा विद्रूप झाल्यास 3 लाखांची मदत पीडितेस दिली जाते. त्याचप्रमाणे ऍसिड हल्ल्यात जखमी झाल्यास त्या व्यक्तीस 50 हजार रुपयांची मदत राज्य सरकारकडून दिली जाते. राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेच्याअंतर्गत लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी पीडित महिलेस 2 लाखांचे अर्थसहाय्य मिळते. क्रूर आणि गंभीर बलात्काराच्या घटनेतील पीडितेला 3 लाखांचे अर्थसहाय्य राज्य सरकारकडून दिले जाते.

साक्ष फिरवण्याची एकही घटना नाही : लैंगिक शोषण आणि लैंगिक अत्याचार पीडितांना 2 ते 3 लाखांपर्यंत राज्य सरकार मदत पुरवते. तक्रारदार मुलीने साक्ष फिरवल्यास किंवा संबंधित अत्याचार करणाऱ्यासोबत लग्न केल्यास ही मदत व्याजासकट परत घेतली जाते. मात्र, मुंबईत साक्ष फिरवण्याची एकही घटना घडली नसल्याचे समोर आले आहे. मनोधर्य योजनेअंतर्गत बलात्कार पीडित व्यक्तींसाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे मदत पुरवली जाते. 50% केंद्र सरकार मार्फत तर 50% राज्य सरकार मार्फत मदत केली जाते. समुपदेशन, निवारा, वैद्यकीय आणि कायदेशीर मदत, आधारसेवा तत्परतेने उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे.

मनोधर्य योजना : राज्यात घडलेल्या घटनांसाठी 2013 पासून मनोधैर्य योजना अंमलात आली. पीडित आणि त्यांच्या वारसदारांना तात्काळ आर्थिक मदत आणि मानसोपचार तज्ञांची सेवा उपलब्ध करून देणे, कायदेशीर सहाय्य उपलब्ध करून देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत 2020 मध्ये पीडित आणि त्यांच्या वारसदारांना 23 लाख 36 हजार 966 रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले. तर 2021 मध्ये 46 लाख 76 हजार 872 रुपयांचे अर्थसहाय्य पीडित आणि त्यांच्या वारसदारांना वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये 29 लाख 41 हजार 338 रुपयांच्या आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा : Mumbai Crime : मुलीला पळवून नेऊन केला अत्याचार; कुटुंबियांना जीवे मारण्याची दिली धमकी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.