मुंबई - हार्बर मार्गावरील लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे लॅपटॉप चोरी करणाऱ्या एका आरोपीला वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून 6 लॅपटॉप आणि एक आयपॅड हस्तगत केला आहे. याची एकूण किंमत 3 लाख रुपये असून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अजय रामासरी चौहान (वय-35) असे आहे.
हेही वाचा - ...तर भाजपला समर्थन, कमलनाथ सरकारमधील मंत्र्यांचं विधान
आरोपी शिवडी येथे राहत असून त्याचे मूळ गाव आझमगड (उत्तरप्रदेश) येथील राहणारा आहे. अजय चौहान हा अनेक दिवस मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा रोड या हार्बर मार्गावरून डाऊन दिशेला गर्दीच्या वेळी लोकल ट्रेनने प्रवास करायचा. लोकल प्रवाशी कामावरून घरी जाते वेळी लॅपटॉप घेऊन लोकल ट्रेनमध्ये बसल्यानंतर ते लोकलमध्ये जागा आणि लॅपटॉप वजन यामुळे प्रवाशी लॅपटॉपबॅग लोकलच्या रॅकवर ठेवतात आणि मोबाईल मध्ये व्यस्त असतात किंवा एखादी झोपेची डुलकी घेतात. अश्या प्रवाशांना अजय हेरून लक्ष नसताना ती बॅग प्रवाशांच्या नकळत चोरत असे. यावर काही प्रवाश्यांनी वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
वडाळा पोलिसांनी प्रवाशांच्या तक्रारीवरून वेगवेगळे पथक तयार करुन आरोपीवर पाळत ठेवली असता संशयित आरोपी अजय चव्हाण याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने आपल्या जवळील 6 लॅपटॉप आणि एक आयपॅड पोलिसांना दिला. तसेच हे विकत घेणाऱ्या आरोपी एकनाथ वलेकर याला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. ज्यांचे लॅपटॉप हरवले असतील आणि तक्रार केली असेल अश्या व्यक्तींनी वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याशी संपर्क साध्यण्याचे आवाहन रेल्वेचेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा - VIDEO: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात महिला चोर सक्रिय; सीसीटीव्हीत चोरी कैद