मुंबई : काँग्रेस पक्ष्याला १३८ वे वर्ष होत आहे. त्याच दिवशी सभेतून शेकडो कार्यकर्ते मागच्या मागे खुर्चीवरून गायब होतात. सुमारे 20 वर्षांनंतर काँग्रेसला अध्यक्षपद मिळाले. मल्लिकार्जुन खरगे त्यांच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात गुजरात हिमाचल विधानसभा निवडणूक पार पाडली. आता मुंबई महापालिकेच्या निवडणूकिसाठी आतापासून काँग्रेस पक्षाने कंबर कसल्याचे दिसत आहे, असे वाटत होते. (Mumbai Congress ) मात्र मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भाई जगताप जेव्हा बोलायला उभे राहिले तेव्हा मागच्या खुर्च्यांवरील हजारो लोके पसार झाले. काँग्रेस अध्यक्ष यांच्या नजरेतून ही सुटली नसणार हे मात्र नक्की. ( language of Mumbai Congress leaders ) एकीकडे काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांच्यासमोर भाई जगताप म्हणत होते की, आपण निर्णय घ्या मुंबईची निवडणूक स्वतंत्र लढू आणि स्वबळावर मुंबईमध्ये सत्ता मिळवू मात्र त्याच वेळी शेकडो लोके घोळक्याने पसार होत होती. ( Mumbai Congress leaders is selfsufficient ही दखल घेण्याजोगीबाब आहे. ( activists in last row of meeting spread )
मुंबई काँग्रेस यामध्ये दोन गट : तसेच मुंबई काँग्रेस यामध्ये दोन गट असल्याचे देखील यावेळी समोर आले. प्रिया दत्त आणि संजय निरुपम हे दोघेही मुंबई काँग्रेसचे नेते यावेळी मंचावर उपस्थित नव्हते. सभेला देखील हजर नव्हते. ह्या बाबत काँग्रेस कार्यकर्ते बोरिवली ब्लॉक उपाध्यक्ष संजय पवार यांनी सांगितले की, संजय निरुपम आणि प्रिया दत्त यांना टाळून हा कार्यक्रम घेतला आहे. वास्तविक ते जुने जाणते नेते आहेत. शिवाय जनता देखील त्यांच्या सोबत आहे. ह्या नेत्यांनी अनेक कार्यकर्त्यांना सोबत न घेता हा कार्यक्रम आयोजित केला गेला.
काँग्रेस पक्षाने कंबर कसल्याचे दिसत आहे : मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधी एकत्र येऊन २८ डिसेंबर १८८५ रोजी 'इंडियन नॅशनल काँग्रेस' म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली.आज काँग्रेस पक्ष्याला १३८ वे वर्ष होत आहे. सुमारे 20 वर्षांनंतर काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सांभाळण्यासाठी एक सक्षम नेतृत्व लाभले आहे ते म्हणजे मल्लिकार्जुन खरगे त्यांच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात गुजरात हिमाचल विधानसभा निवडणूक पार पाडली. आता मुंबई महापालिकेच्या निवडणूकिसाठी आतापासून काँग्रेस पक्षाने कंबर कसल्याचे दिसत आहे. मात्र मुख्य मंच उजवीकडे तर दुसरा मंच डावीकडे असल्याचे आढळले.
मुंबई प्रदेश काँग्रेस नेते व काही नगरसेवक यांच्यासाठी स्वतंत्र मंच : मात्र १३८ व्या स्थापना दिवसात सोमय्या मैदानात मात्र काँग्रेस पक्षाने दोन मंच केल्याचे दृष्टीस पडले. ह्या मंचावर जवळपास 50 नेते विराजमान झालेले दिसत होते. ह्या मांचावरील काही नेते यांच्याकडे विचारणा केली तर हलकेच सांगितले. इकडे मुंबईचे नेते आहेत तिकडे उजव्या बाजूला राज्याचे देशाचे नेते बसले आहेत. काँग्रेसचे मुंबई चे नेते पत्रकार आणि संपादक म्हणूनभूमीका निभावलेले युवराज मोहिते देखील ह्या मंचावर दिसले त्यांना विचारले की दोन मंच का तर ते म्हणाले, तिकडे जागेची अडचण झाली असती म्हणून मोकळ्या ठिकाणी हा मंच आहे, त्यांनी अधिक बोलणे टाळाले. मात्र काँग्रेसच्या मुंबईतील कार्यकर्ते जगदीश वाघमारे यांनी सांगितले, डावीकडे राज्याचे नेते आहेत उजवीकडे मुंबईचे नेते आहेत.जागा नसेल म्हणून इकडे व्यवस्था केली आहे.