ETV Bharat / state

ST Corporation : दिवाळीत मिळणार लालपरीला उभारी; 2000 इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर - दिवाळीत मिळणार लालपरीला उभारी

दिवाळीत लाल परीला उभारी मिळणार, ( LalPari will get boost in Diwali ) एसटी महामंडळाकडे स्वतःच्या मालकीच्या 2000 डिझेलच्या बसेस दाखल होणार. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार निर्णय 2000 आर इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर मिळणार राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता मिळणार तर उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळ स्वतःची जागा नाशिक महानगरपालिकेला भाड्याने देणार.

ST Corporation
ST Corporation
author img

By

Published : Oct 27, 2022, 5:18 PM IST

मुंबई : एसटी महामंडळ तोट्यात का चालत, ( LalPari will get boost in Diwali ) तर एसटीचे उत्पन्न वाढत नाही. ( ST Corporation will have diesel buses ) एसटीची उत्पन्न का वाढत नाही, तर एसटी महामंडळाकडे स्वतःच्या मालकीच्या बसेस नाही. या मुख्य मुद्द्यावर उद्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत स्वतःच्या मालकीच्या 2000 डिझेलच्या बसेस आणि भाडेतत्त्वावर इलेक्ट्रिकच्या 2000 बसेस घेण्याचा निर्णय उद्या होईल यामुळे एसटीचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

ST Corporation

भाडेतत्त्वावर इलेक्ट्रिकच्या बसेस : कोरोना काळामध्ये देशाचा अर्थव्यवस्थेचा गाडा रुतलेला आहे. त्यातून सावरत सावरत आता कुठे व्यवहार सुरळीत झाले. मात्र अर्थव्यवस्थेचे गतीचक्र ज्या रीतीने चालायला हवं ते अजून चालत नाही, हे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनावरून लक्षात येते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्येही एसटी महामंडळाला गतिमान करण्यासाठी राज्यात डिझेलच्या बसेस ज्या स्वतःच्या मालकीच्या एसटी महामंडळाच्या असेल त्या घेण्याचा निर्णय होणार आहे. तसेच भाडेतत्त्वावर इलेक्ट्रिकच्या बसेस घेतल्या जातील.

लालपरी आता अधिक गतीने धावण्याची शक्यता : एसटी महामंडळाच्या स्वतःच्या मालकीच्या ज्या डिझेलच्या बसेस असणार आहेत. त्या अत्यंत नव्या असणार आहेत. त्यामुळे बसेची अपुरी संख्या या समस्येतून मार्ग निघणार आहे आणि खेडोपाडी धावणारी लालपरी आता अधिक गतीने धावण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक महानगरपालिकेला एसटी महामंडळ जागा वापरायला देणार आहे. भाडेतत्त्वावर यातून देखील एसटी महामंडळाला काहीसे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळण्याची दाट शक्यता : यासंदर्भात महाराष्ट्र एसटी महामंडळ काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांच्यासोबत ईटीवी भारत वतीने संवाद साधला असता त्यांनी सांगितले की उद्या ही 302 क्रमांकाची बैठक होणार आहे. योगायोगाने 75 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एसटी महामंडळाचे चेअरमन तसेच मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री एकच व्यक्ती असल्यामुळे फायलींवर मंजुरी लवकर मिळते आणि त्याबाबत उद्या तो निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर नाशिक येथील महानगरपालिकेला जागा एसटी महामंडळ भाड्याने देणार आहे. दरम्यान एसटी महामंडळाच्या प्रवक्ते यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांना या संदर्भात माहिती नसल्याच त्यांनी ईटीवी भारतकडे सांगितलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.