ETV Bharat / state

लालबाग गॅस दुर्घटना : मृतांचा आकडा ६ वर, ७ जण गंभीर - lalbagh gas accident death news

लालबाग येथील साराभाई इमारतीत ६ डिसेंबर रोजी गॅस सिलिंडर स्फोटात १६ जण जखमी झाले होते. या दुर्घटनेत काल आणखी एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ६ वर पोहोचला आहे.

lalbagh gas accident death toll rises to 6
लालबाग गॅस दुर्घटना : मृतांचा आकडा ६ वर, ७ जण गंभीर
author img

By

Published : Dec 13, 2020, 6:51 PM IST

मुंबई - लालबाग येथील साराभाई इमारतीत ६ डिसेंबर रोजी गॅस सिलिंडर स्फोटात १६ जण जखमी झाले होते. या दुर्घटनेत आणखी एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ६ वर पोहोचला आहे. तर ७ जणांची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, लालबाग, साराभाई इमारतीत राहणारे मंगेश राणे यांच्या घरात मुलीचे लग्नकार्य होते. ६ डिसेंबर रोजी हळदीचा कार्यक्रम होता. त्यासाठी सकाळच्या सुमारास जेवण बनवले जाणार होते. मात्र रात्रीपासून गॅस गळती झाल्याने गॅस पेटवताच सिलेंडरचा स्फोट होऊन १६ जण जखमी झाले होते. त्यापैकी गंभीर जखमी सुशीला बांगरे (वय ६२) आणि करीम (वय ४५) यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता.

एकाच दिवशी ३ जणांचा मृत्यू -
शुक्रवार ११ डिसेंबर रोजी सकाळी ९.१५ वाजता मंगेश राणे (वय ६१), सकाळी ९.२५ वाजता ज्ञानदेव सावंत (वय ८५) यांचा तर दुपारी १.३० वाजता महेश मुणगे (वय ५६) यांचा अशा तीन जणांचा मृत्यू एकाच दिवशी झाला होता. त्यामुळे मृतांची संख्या ५ वर गेली होती. शनिवारी सायंकाळी ७.४५ वाजता विनायक शिंदे (वय ४७ वर्ष) यांचा केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. यामुळे मृतांची आकडेवारी ६ वर पोहोचली आहे. केईएम रुग्णालयात ६ जणांचा मृत्यू झाला असून ३ जणांची प्रकृती गंभीर आहे. ३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मसिना रुग्णालयात ४ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

३ जणांना डिस्चार्ज -
गॅस सिलेंडर स्फोटातील जखमींपैकी मिहिर चव्हाण (वय २०), प्रथमेश मुणगेकर (वय २७) या दोघांना ८ डिसेंबर रोजी तर त्यानंतर ममता मुणगे (वय ४८) यांनाही बरे वाटल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हेही वाचा - 25 तारखेला बरं वाईट झालं तर त्याला सरकार जबाबदार असेल - मेटे

हेही वाचा - रंगबिरंगी कपड्यांशिवाय मला मंत्रालयात कसे येता येईल? रामदास आठवले म्हणाले..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.