ETV Bharat / state

Mumbai Crime News : मजुराने डोक्यात हातोडा मारून केला दुसऱ्या मजुराचा खून - मजुराचा किरकोळ वादातून खून

बोरिवली येथे एका मजुराने दुसऱ्या मजुराचा किरकोळ वादातून खून केल्याची घटना घडली आहे. आरोपीने मजुराच्या डोक्यात हातोड्याने वार करत त्याला ठार मारले.

Mumbai Crime News
बोरिवलीत मजुराची हत्या
author img

By

Published : Jun 11, 2023, 7:38 PM IST

मुंबई : मुंबईतल्या बोरिवली पूर्व कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खुनाची घटना उघडकीस आली आहे. येथे दोन मजुरांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका मजुराने दुसऱ्या मजुराच्या डोक्यात हातोड्याने वार करून त्याचा खून केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मजूराचा जागीच मृत्यू : मृत मजूर अजितकुमार साहनी (33) आणि आरोपी रामपुकर साहनी (30) हे दोघेही बिहारचे रहिवासी आहेत. ते बोरिवली पूर्व देवीपाडा येथे एकत्र राहत होते. ते दोघे एकत्र गवंडी म्हणून काम करत होते. काल रात्री मद्यधुंद अवस्थेत दोघांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यानंतर संतप्त झालेल्या रामपुकर साहनीने अजितकुमारच्या डोक्यात हातोड्याने वार केले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कस्तुरबा पोलिसांनी आरोपीला बोरिवली येथून अटक केली आहे.

विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरून मित्राचा खून : मुंबईच्या कांदिवली पूर्वेकडील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका पत्नीच्या प्रियकराने तिचा पती आणि त्याच्या जिवलग मित्राची हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह जवळच्या जंगलात नेऊन पुरला. पोलिसांना शोध घेतला असता त्यांना मृतदेह सापडले. पत्नीशी प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून त्यांचा वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हाणामारीत प्रियकराने मित्राचा लोखंडी हातोडा मारून खून केला. दिनेश प्रजापति (वय 38) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर सुरेश कुमावत (वय 26) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने पोलिसांना मृतदेह जंगलात पुरल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

हे ही वाचा :

  1. Triple Murder In Bihar : माथेफिरू बापलेकांनी चाकूने भोसकले; जमिनीच्या वादातून घडले तिघांचे हत्याकांड, अनेकजण जखमी
  2. Mumbai Crime News: प्रियकराने प्रेयसीच्या पतीचा खून करून पुरला मृतदेह, पोलिसांनी शिताफीने आरोपीला केली अटक
  3. Mumbai Crime : वाढदिवसाच्या पार्टीच्या बिलाचा वाद, दोन अल्पवयीनांसह चौघांनी केली मित्राची हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.