मुंबई : कोरियन महिलेचा विनयभंग (Korean Woman Molestation Case) आणि छेडछाड प्रकरणी दोन्ही आरोपींना बांद्रा दंडाधिकारी न्यायालयातून जामीन मंजूर (accused granted bail by Bandra court) केला आहे. मोबिन चांद मोहम्मद (19) आणि मोहम्मद नकीब अन्सारी (20) या दोघांची कारागृहातून सुटका करण्यात आली. (latest news from Mumbai) दोन्ही आरोपींना प्रत्येकी 15 हजारांचा जामीन मंजूर झाला. (Mumbai Crime) आरोपपत्र दाखल होईपर्यंत दर मंगळवारी खार पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश दोघांनाही देण्यात आले.
आरोपींना पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश : मुंबईत एका कोरियन तरुणीचा दोन टवाळखोरांनी काही दिवसांपूर्वी विनयभंग केला होता. या संतापजनक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली होती. या दोन्ही आरोपींची आज जामिनावर सुटका झाली आहे. या आरोपींचे मोबीन चांद मोहम्मद आणि मोहम्मद नकीब अन्सारी यांना आज जामीन मिळाला आहे. मात्र या प्रकरणातील आरोपपत्र दाखल होईपर्यंत न्यायालयाने दोन्ही आरोपींना दर मंगळवारी खार पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश दिले आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईत काही स्थानिक तरुणांनी भर रस्त्यात एका कोरियन तरुणीची छेड काढली होती. बुधवारी 30 नोव्हेंबर रोजी रात्री ही संतापजनक घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओ समोर येताच मुंबईकरांनी संताप व्यक्त केला होता. त्यांना पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली होती. पीडित तरुणी ही युट्यूबर असून ती दक्षिण कोरियाची नागरिक आहे. एका तरुणाने मुंबई पोलिसांना टॅग करून हा व्हिडीओ ट्वीट केला होता. व्हिडीओ समोर येताच पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली.