मुंबई - नॉलेज ३६० या संस्थेमार्फत JEE (IIT), NEET, AIIMS या परीक्षेला बसणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेच्या संस्थापकांनी ही माहिती दिली आहे.
खासगी क्लासेसमध्ये JEE (IIT), NEET, AIIMS या परीक्षेसाठी शुल्क मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना ते परवडत नाही. त्यामुळे अशा परिक्षा देऊ इच्छिणाऱ्या परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्याचे उद्दिष्ट मुंबईतील 'नॉलेज ३६०' या संस्थेने हाती घेतले आहे. या संस्थेने एक खास उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांचे भविष्य त्यांचा आवडीच्या अभ्यासक्रमात घडवण्याचे व तेही मोफत करण्याचे ठरवले आहे.
'नॉलेज ३६०' संस्थेचे खास अभ्यासक्रम हे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आहे. या संस्थेमार्फत ३० विद्यार्थ्यांची विशेष बॅच भारतातल्या सर्वोत्तम प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षित केली जाणार आहे. राज्य शिक्षण मंडळानुसार गणित आणि विज्ञान या विषयात ९९ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना या संस्थेमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित विषयांमध्ये ९६ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती नॉलेज करून देण्यात येणार आहे. तसेच तज्ञ मार्गदर्शक या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
नॉलेज ३६० या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या आणि तथाकथित महागड्या कोचिंग क्लासेसची फी भरण्यास असमर्थ असणाऱ्या पालकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे JEE (IIT), NEET, AIIMS या अभ्यासक्रमाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. ही यशाची संधी नॉलेज 360 या खासगी संस्थेच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यासाठी लवकरच मुंबईत असणाऱ्या या सेवाभावी संस्थेशी विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा. त्यासाठी www.knowledge360.com या संकेतस्थळावर यासंदर्भात पाहणी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.