मुंबई Kissing video threatened viral : 26 वर्षीय तक्रारदार तरुणी ही मूळची हैदराबादची असून ती अंधेरी परिसरात राहते. ती ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करते. याच दरम्यानच टिमोथी तिला भेटला होता. ओळखीनंतर हे दोघे चांगले मित्र बनले. तो तिला सर्व मदतीचं आश्वासन देत होता. त्यानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटचा वापर देखील केला होता. त्यावरून त्यानं तिचं इंस्टाग्रामवर बोगस अकाउंट उघडलं. या अकाऊंटमध्ये तिनं तिच्या मित्राचे दुसऱ्या मुलीसोबतचे काही फोटो शेअर केले होते. दुसऱ्या मुलीसोबत अफेअर असल्याचे त्यानं तिला मेसेजद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला.
किसिंगचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी : त्यानंतर त्यानं किस करतानाचा अश्लील व्हिडिओ तिच्या नातेवाईकांना पाठवून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. तोच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, त्यानं तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. बदनामीच्या भीतीनं तिनं टिमोथी फर्नांडिसला सुमारे २३ लाख रुपये दिले होते. त्यापैकी अठरा लाख रोख, तर पाच लाख रुपये तिने ऑनलाइन ट्रान्सफर केले होते. काही महिन्यांपूर्वी ती हैदराबाद येथील तिच्या घरी गेली होती. यावेळी टिमोथीही तिच्यासोबत तिथं गेला होता. तिच्या राहत्या घरी बाथरूममध्ये आंघोळ करत असताना त्यानं बाथरूमच्या खिडकीतून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तसंच संबंध तोडण्याची धमकी दिली होती. जर ती पुन्हा मित्रासोबत दिसली तर तो स्वत: आत्महत्या करेल, असं धमकवलं होतं. त्याच्या धमकीला भीक न घातल्यानं त्यानं सोशल मीडियावर ती कॉलगर्ल असून तिच्याविषयी अश्लील मजकूर अपलोड करुन तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता.
एकतर्फी प्रेमसंबंधातून घडला प्रकार : फर्नांडीसकडून सुरू असलेल्या मानसिक अत्याचाराला कंटाळून तिनं आंबोली पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खंडणीची धमकी देणे, बदनामी करणे, अश्लील संभाषण करून विनयभंग करणे, पाठलाग करणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. ही शोधमोहीम सुरू असताना तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याला अटक केली होती. तो सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत. तपासात टिमोथीचे तक्रारदारासोबत एकतर्फी प्रेमसंबंध होते. ती एकावर प्रेम करत असल्यानं तो तिच्यावर रागावला होता. तिनं त्याच्यासोबत मैत्री तोडून त्याच्याशी नातं प्रस्थापित करावं, अशी त्याची इच्छा होती. त्यामुळं सोशल मीडियावर तिची बदनामी करून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. तिच्याकडून खंडणीची मागणी करून सुमारे २३ लाखांचा गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे.
हेही वाचा -
- Mumbai Rape Case : धक्कादायक, बलात्कारानंतर मानसिक आजारानं ग्रस्त पीडितेचा मृत्यू, आरोपीला न्यायालयानं ठोठावली दहा वर्षांची कोठडी
- Mumbai Crime : कॅसिनो खेळण्यासाठी घरफोडी; साकीनाका पोलिसांनी आरोपीच्या झारखंडमधून आवळल्या मुसक्या
- Thane Crime : सावकाराच्या जाचामुळे महिलेची रेल्वेखाली आत्महत्या; तर प्रेमीयुगुलानं गळफास घेऊन संपवलं जीवन