मुंबई - मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे ऑक्सिजन प्लांट निविदेत घोटाळा झाल्याचा खळबळजनक दावा केला. आता या विरोधात भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या हे लोकायुक्तांकडे तक्रार करणार आहेत. तसेच या सर्व प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी व्हावी अशी मागणी केली असून त्यांच्याकडून करण्यात येणार आहे.
पालकमंत्र्यांनी केला भ्रष्टाचाराचा आरोप -
ब्लॅक लिस्ट यादीत नाव असलेल्या हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला ऑक्सिजन प्लांट तयार करण्याचे काम दिल्याचा आरोप मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्याकडून करण्यात आला आहे. याची तक्रार अस्लम शेख यांनी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. काही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंपनीशी हातमिळवणी करत भ्रष्टाचाराचा हा घाट घातला असल्याचा आरोप त्यांनी आपल्या पत्रातून केला.
नेमके काय आहे प्रकरण ?
ऑक्सिजन प्लांट निविदेत 320 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे. मुंबई नियोजित ऑक्सिजन प्लांट तयार होणार आहेत. मात्र त्याआधीच मुंबई महापालिकेने हायवे कस्ट्रक्शन या कंपनीला ऑक्सिजन जनरेटर बसविण्याचे काम दिले असल्याचा आरोप अस्लम शेख यांनी आपल्या पत्रातून केला आहे. भायखळा येथील जिजामाता उद्यानातील प्राणिसंग्रहालयात पेंग्विन संलग्न प्रकल्पात संबंधित कंपनीला दंड आकारल्या आला आहे. तसेच मुंबई मधील ऑक्सीजन प्लांट संदर्भातली कामे संबंधित कंपनीने पूर्ण केलेली नाहीत. तरी ही हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राट देण्याचा घाट घातला जात असल्याचा आता थेट आरोप पालकमंत्री अस्लम शेख यांनी केला आहे.
सखोल चौकशीची केली मागणी -
मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांना पत्र पाठवून या प्रकरणी 320 कोटी रुपयांचा घोटाळा होत आपल्याचा आरोप ही अस्लम शेख यांनी पत्रात केला आहे. मूळ किमतीपेक्षा अधिक पैसे हायवे कस्ट्रक्शन या कंपनीला दिले जात आहेत. यात मॅच फिक्सिंग होत असून आयुक्तांनी याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी अस्लम शेख यांनी केली आहे.
किरीट सोमैया करणार तक्रार -
पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आरोपनंतर भाजपानेते किरीट सोमैया यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देतांना सांगितले की, या ऑक्सिजन प्लांटमध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे त्याची सखोल चौकशी करावी अशी तक्रार लोकायुक्तांकडे करणार असल्याचे म्हटले आहे.