मुंबई - संजय राऊत यांच्या पत्नी ईडीच्या चौकशीच्या रडारवर असताना शिवसेनेचा आणखी एक नेता आणि त्याचा परिवार पीएमसी बँकेचा घोटाळ्याचा लाभार्थी असल्याचा, दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यात त्यांनी कोणाचेही नाव न घेता, चौकशीची मागणी केली आहे.
खासदार राऊत यांच्यानंतर पुन्हा शिवसेनेचा लाभार्थीपीएमसी बँक घोटाळ्यात डीएचएफएलचे प्रवीण राऊत यांची चौकशी केली जात आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यात १२ वर्षांपूर्वी, प्रविण राऊत यांच्याकडून ५० लाख रुपये भरण्यात आले होते. याबाबत प्रविण राऊत व त्यांच्या पत्नीचा जबाब नोंदविण्यात आला आहे. ईडी गेल्या दीड महिन्यापासून वर्षा राऊत यांच्याकडे याबाबत पत्रव्यवहार करून विचारणा करीत आहे. मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना २९ डिसेंबरला ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याबाबत समन्स बजाविले होते. मात्र संजय राऊत यांच्या पत्नीची प्रकृती स्थिर नसल्याने त्यांनी 4 तारखेला ईडी कार्यालयात हजेरी लावली. भाजपने यावरून शिवसेनेवर आरोप करत टीका देखील केली. सद्या या विषयावरून भाजप व शिवसेना नेत्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. त्यात आता पुन्हा भाजप नेते सोमय्या यांनी शिवसेनेवर बाण मारला आहे.
चौकशीतून एक गोष्ट बाहेर आली की, शिवसेनेचा आणखी एक नेता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत म्हटलंय की, पीएमसी बँक, एचडीआयएल प्रविण राऊत घोटाळ्याची चौकशी सध्या ईडीकडून करण्यात येत आहे. अशाचवेळी या चौकशीतून एक गोष्ट बाहेर आली की, शिवसेनेचा आणखी एक नेता जो खासदार राहिलेला आहे. ते देखील पीएमसी घोटाळ्याचे लाभार्थी राहिल्याचे समोर आले आहे. त्यांच्या कुटुंबाचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.
हेही वाचा - फेसबुक लाईव्ह करत चिरला स्वत:चा गळा; पुढे काय घडले वाचा एका क्लिकवर
हेही वाचा - 25 जानेवारीपर्यंत लोकल नियमित? योग्य नियोजन करून रेल्वे होणार सुरू