मुंबई - अनेक वर्षापासून विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावून त्यांना कोंडीत पकडणारे भाजप नेते माजी खासदार किरीट सोमैय्या आता स्वतः मोठ्या संकटात सापडले आहेत. सोमवारी एका खासगी वृत्तवाहिनीने त्यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ दाखविला. त्यानंतर त्यांच्यावर विरोधी पक्षातील नेत्यांकडून, महिलांकडून जहरी टीका केली जात आहे. सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजणार आहे. अशा परिस्थितीत किरीट सोमैय्या यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
काय म्हटले आहे पत्रात? एका वृत्तवाहिनीवर व्हिडिओ क्लिप दाखविण्यात आली आहे. त्यावरून अनेक व्यक्तींना अनेक आरोप करून आक्षेप घेतले आहे. अनेक व्हिडिओ क्लिप्स असल्याचा दावा करण्यात आला आहे. अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा व तशा तक्रारी असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, कोणत्याही महिलेवर अत्याचार केले नसल्याचा दावा किरिट सोमैय्या यांनी केला. माझ्यावर केलेल्या सर्व आरोपांची चौकशी व्हावी, अशी सोमैय्या यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. ही व्हिडिओ क्लिप किंवा इतर व्हिडिओ असल्यास सत्यता तपासावी. त्यानुसार चौकशी करावी, अशी विनंती केली आहे.
-
एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही
अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी @Dev_Fadnavis यांना विनंति pic.twitter.com/Q1YLoP0ZUi
">एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 18, 2023
माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही
अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी @Dev_Fadnavis यांना विनंति pic.twitter.com/Q1YLoP0ZUiएका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 18, 2023
माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही
अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी @Dev_Fadnavis यांना विनंति pic.twitter.com/Q1YLoP0ZUi
मी योग्य वेळी बोलेन - अंबादास दानवे- किरीट सोमैय्या यांची कथित आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी महिलांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. याविषयी बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले आहेत की, किरीट सोमैय्या यांनी ईडी, सीबीआयचा धाक दाखवून अनेकांना ब्लॅकमेल केले आहे. तसेच काही महिलांचे शोषण केल्याच्या तक्रारी सुद्धा माझ्या कानावर आल्या आहेत. मी जर का त्याविषयी आता बोललो तर त्या माता भगिनींची ओळख दाखवावी लागेल. हे शक्य नाही. परंतु मी यासंदर्भात योग्यवेळी बोलेन असेही दानवे म्हणाले आहेत.
पक्षातून हकालपट्टी करा - विद्या चव्हाण- किरीट सोमैय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडिओ क्लिपवर बोलताना शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण म्हणाल्या आहेत की, आतापर्यंत दुसऱ्यांवर चिखल उडवणारे किरीट सोमैय्या आता स्वत: चिखलात लोळत आहेत. सोमय्या महिलांसोबत असे अश्लील प्रकार करत असतील तर त्यांना दुसऱ्यांवर बोलण्याचा काहीच अधिकार नाही. गृहमंत्र्यांनी चौकशी केलीच पाहिजे, तसेच भाजपने सोमैय्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही विद्या चव्हाण यांनी केली आहे.
(ईटीव्ही भारत कथित आक्षेपार्ह व्हिडिओबाबत कोणतीही पुष्टी करत नाही.)