ETV Bharat / state

'शिवसेनेला तर सत्तेची लालसा.. सोनिया गांधींना खुश करण्यासाठीच मोदींवर टीका'

सोमवारी रात्री चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर केलेल्या हल्ल्यात आपल्या 20 जवानांना वीरमरण आले. त्यानंतर शिवसेना नेत्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करत, प्रश्न विचारले होते. त्यावर मोदी हे उत्तम नेतृत्व आहेत म्हणणारी शिवसेना आता सत्तेच्या लालसेपोटी त्यांच्यात दम नाही असे म्हणत आहे, अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

किरीट सोमय्या
किरीट सोमय्या
author img

By

Published : Jun 18, 2020, 1:54 PM IST

मुंबई - चीन-भारत दरम्यान झालेल्या संघर्षावर राजकारण तापताना दिसत आहे. बुधवारी खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारले होते. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.

सोमवारी रात्री चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर केलेल्या हल्ल्यात आपल्या 20 जवानांना वीरमरण आले. त्यानंतर शिवसेना नेत्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करत, प्रश्न विचारले होते. त्यावर मोदी हे उत्तम नेतृत्व आहेत म्हणणारी शिवसेना आता सत्तेच्या लालसेपोटी त्यांच्यात दम नाही असे म्हणत आहे, अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

चिनी सैन्याने भारतीय सैन्यावर हल्ला करून आपले 20 जवान मारले. चीनच्या या हल्ल्याला योग्य प्रतिसाद कधी मिळेल?, चीनने आपल्या सैन्यावर हल्ला केला आणि आपण काय केले?, चीनचे किती जवान मारले गेले? चीनने आपल्या भूमीत प्रवेश केला आहे? आपण त्यांना काय प्रत्युत्तर देणार. या संघर्षात आम्ही तुमच्यासोबत आहोत. मात्र, सत्य काय आहे? काहीतरी सांगा. देशाला सत्य जाणून घ्यायचे आहे. असे ट्विट करत बुधवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले होते.

तसेच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारत त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर आज भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर करत टोला लगावला आहे.

किरीट सोमय्या, भाजप नेते
किरीट सोमय्या म्हणाले, की विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदी हे देशाचे उत्तम नेतृत्व आहेत, त्यांच्या नेतृत्वात देश पुढे वाटचाल करत आहे, असे म्हणणारी शिवसेना आता सत्तेच्या लालसेपोटी आणि सोनिया गांधींना खूश करण्यासाठी मोदींच्या नेतृत्वात दम नाही, असे म्हणत आहे. 'वाह रे शिवसेना' असे म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला टोला लगावला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.