ETV Bharat / state

शिवसेनेचा भगवा आता हिरवा झाला आहे का? - सोमैया

author img

By

Published : Jan 4, 2021, 3:58 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेने ठरवायचे आहे की त्यांचा भगवा हा खरच भगवा आहे की हिरवा झाला आहे, असे म्हणत भाजप नेते किरीट सोमैया यांनी औरंगाबाद नामांतराच्या प्रश्नावरुन शिवसेनेवर खोचक टीका केली आहे.

किरीट सोमैया
ba

मुंबई - औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापत आहे. याच मुद्द्यावरुन भाजप नेते किरीट सोमैया यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेने ठरवायचे आहे की त्यांचा भगवा हा खरच भगवा आहे की हिरवा झाला आहे, असे म्हणत भाजप नेते किरीट सोमैया यांनी शिवसेनेवर खोचक टीका केली आहे.

बोलताना किरीट सोमैया

ते म्हणाले, काँग्रेसनंतर आता समाजवादी पक्षानेही औरंगाबादचे नामांतरण करू नये, अशी भूमिका घेतली आहे. मात्र, औरंगाबादला संभाजीनगर संबोधणाऱ्या शिवसनेने नामांतराबाबत आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही. यामुळे आताची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांना मानणारी भगवी शिवसेना आहे की, त्यांचा रंग हिरवा झाला आहे, असा सवाल सोमैयांनी उपस्थित केला आहे.

सेना-भाजपात रंगले शाब्दिक युद्ध

काँग्रेसने औरंगाबादच्या नामांतराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसनेनेही आपली भूमिका लवकरत स्पष्ट करावी, अशी मागणी भाजप नेते करत आहेत. त्यावर स्पष्टीकरण देताना शिवसेनेने आपले मुखपत्र सामनातून म्हटले आहे की, काँग्रेसचा मुख्यमंत्री असतानाच बाळासाहेबांनी औरंगाबादचे नाव बदलले आहे आणि जनतेने ते स्वीकारले आहे. तसेच प्रश्न राहिला सरकारी कागदपत्रांचा. त्यावरही लवकरच दुरुस्ती होईल. भाजपास त्याची काळजी नको,’ असे म्हणत शिवसेनेने भूमिका बदलली नसल्याचे सांगत मुखपत्र सामनामधून भाजपवर घणाघाती टीका केली. यावपरुन नामांतराच्या विषयावरुन सेना-भाजपात शाब्दिक युद्ध रंगल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

हेही वाचा - "ही तर टाटा, बिर्लाची सेना"; आशिष शेलारांची मुंबई महापालिका व शिवसेनेवर टीका

हेही वाचा - वर्षा राऊत एक दिवसआधीच 'ईडी' कार्यालयात हजर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.