मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भोवती चौकशीचा फास अधिक आवळला जात आहे, की काय अशी परिस्थिती निर्माण होत आहे. एसआरए प्राधिकरणाने किशोरी पेडणेकर यांच्या 4 बेनामी मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार: भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार मुंबई पोलिसात दिली गेली होती. त्यानंतर चौकशी वेगाने केली जात असून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी किशोरी पेडणेकर यांच्या 4 बेनामी मालमत्ता कलम 3 अंतर्गत जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत.
शिवसेनेकडून भाजपावर हल्ला: किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या एकेक नेत्यांमागे चौकशी लावण्याचा सपाटा जो लावलाय आहे. त्यामुळे शिवसेनेकडून भाजपावर जो हल्ला बोल होतो, त्याची धार कमी करण्यात किरीट सोमैयांच्या तक्रारीमुळे यश येते असे दिसते. पेडणेकर यांच्या मागे मुंबई पोलीस आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणकडून देखील आता चौकशी पुढे काय वळण घेते ते येत्या काळात स्पष्ट होईल.
कब्जा केल्याची तक्रार: या 4 बेनामी मालमत्ता मध्ये कीश कार्पोरेट सर्विस आणि इतर बेनामी सहकारी यांच्या वरळी येथील गोमाता जनता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण येथील 4 सदनिकांवर बेकायदेशीरपणे पेडणेकर यांनी कब्जा केल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी दिली होती. एसआरए वतीने त्याची चौकशी सुरू केली असून आत पुढील आठवड्यात या 4 बेनामी मालमत्ता जप्ती होणार आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर आता या संकटाचा सामना कसा करतात, ते त्यांच्या आणि शिवसेनेसाठी महत्वाचे आहे. एवढं मात्र नक्की आहे.