मुंबई : एसआरए फ्लॅट प्रकरणी भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीनंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kirit Somaiya Allegation Kishori Pednekar) यांना पुन्हा दादर पोलीस स्टेशनला यावे लागणार, असे किरीट सोमैय्या यांनी म्हटलेले (Kirit Somaiya on SRA Scam Mumbai) आहे.
किरीट सोमैय्यांचे ट्विट : मुंबईच्या एसआरए फ्लॅट संदर्भात पैसे घेतले, पण फ्लॅट मिळाले नाही. फसवले गेल्याची तक्रार करण्यात आली. या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी चौकशी केली आणि या चौकशीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याने माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे नाव स्टेटमेंट देताना घेतले. त्यामुळे चौकशीची दिशा आता किशोरी पेडणेकर यांच्याकडे वळली असून किरीट सोमैय्या यांनी यासंदर्भात महत्त्वाची ट्विट केलेले (Kirit Somaiya Tweet) आहे.
किशोरी पेडणेकर पोलीस चौकशी : किरीट सोमैय्या यांनी म्हटलेलं आहे कि,किश कॉर्पोरेट कंपनी विरुद्ध मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये चौकशी होणार. तसेच वरळीच्या सहा एसआरए फ्लॅटचा बेकायदेशीर ताबा मिळवलेला आहे. तसेच कीश कॉर्पोरेट कंपनीला बीएमसीने कोविड काळात कॉन्ट्रॅक्ट देखील दिले आहे. आणि सर्व घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी माझी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांना पुन्हा दादर पोलीस स्टेशनमध्ये यावे लागणार, दादर पोलीस स्टेशन या ठिकाणी 12 एसआरए फ्लॅटच्या फसवणुकीसाठी त्यांना चौकशीला यावे (Kishori Pednekar Enquires) लागणार.
फ्लॅट मिळवून देण्यासाठी पैशाची मागणी- या एफआयआरमध्ये किशोरी पेडणेकर यांचे नाव नव्हते. मात्र, याप्रकरणी चौकशीअंती ४ जणांना अटक करण्यात आली. ज्यात एक आरोपी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा शेजारी आणि जवळची आहे. तर एक बीएमसीचा कर्मचारी आहे. या दोघांनी आपल्या जबाबात माजी महापौरांचे नाव घेतले आहे. एसआरए फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे घेतल्याची तक्रार एकूण 9 जणांनी केली. पण फ्लॅट मिळाला नाही. 9 जणांकडून घेतलेल्या पैशांपैकी काही हिस्सा किशोरी पेडणेकर यांच्याकडेही गेल्याचा दावा महापौरांची नावे सांगणाऱ्या दोघांनी केला आहे. त्यामुळेच काल पहिल्यांदा किशोरी पेडणेकर यांना बोलावून पोलिसांकडून विचारपूस करण्यात (Kishori Pednekar SRA Scam Mumbai) आली.
काय आहे प्रकरण - मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) आणि त्यांच्या किश कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने वरळी येथील गोमाता जनता एसआरएमध्ये काही गाळे हडप केले. काही गाळे बेनामी हस्तकत केले. यासंबंधी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांच्याकडे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली आहे. किशोरी पेडणेकर यांनी 2017 महापालिका निवडणूक नामांकन पत्रात त्यांचे रहिवासी ठिकाण म्हणून वरळी गोमाता जनता एसआरएच्या सहाव्या मजल्याच्या सदनिकेचा पत्ता दिला होता. तर किशोरी पेडणेकर किश कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेडच्या मालक आणि प्रमोटर आहेत. त्यांनी या कंपनीची रचना करताना या कंपनीचा रजिस्टर ऑफ कार्यालय म्हणून हा पत्ता रजिस्टर ऑफ कंपनी भारत सरकारकडे गोमाता जनता एसआरए प्रकल्पातील तळमजल्यातील दोन काळे दर्शवले होते. जे लाभार्थी होते म्हणजे त्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या यादी पेडणेकर परिवाराचे नाव नाही. लाभार्थी नसताना देखील किशोरी पेडणेकर अशा प्रकारे वरळी गोमाता जनता एसआरएचे अनेक गाळे आपल्या ताब्यात घेतले आहेत, असा आरोप किरीट सोमैय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे.
सतीश लोखंडे यांची मागणी- या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांना पत्र लिहिले असून त्या प्रकरणाची चौकशी करून किशोरी पेडणेकर आणि किश कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेडला नोटीस द्यावी आणि हे गाळे ताब्यात घ्यावे अशी विनंती सतीश लोखंडे यांना केली आहे.