ETV Bharat / state

लॉकडाऊनमध्ये ७० हजार तृतीयपंथीय, २० हजार महिलांना मदत करणारी 'किन्नर माँ' - Demand for 'Kinnar Maa' organization

तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या 'किन्नर माँ' या संस्थेने गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये तृतीयपंथीयांना मोठी मदत केली होती. ही संस्था यावर्षीही त्यांच्या मदतीसाठी सरसावली आहे. सध्याच्या लॉकडाऊनमध्ये ही संस्था पुन्हा एकदा धान्य वाटपासह इतरही जिवनाश्यक गोष्टींचे वाटप करणार आहे. तसेच ही संस्था फक्त तृतीयपंथींनाच नाही, तर निराधार महिलांना देखील मदत करते.

mumbai third party news
mumbai third party news
author img

By

Published : Apr 20, 2021, 9:32 PM IST

Updated : Apr 21, 2021, 12:41 PM IST

मुंबई - तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या 'किन्नर माँ' या संस्थेने गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये तृतीयपंथीयांना मोठी मदत केली होती. ही संस्था यावर्षीही त्यांच्या मदतीसाठी सरसावली आहे. सध्याच्या लॉकडाऊनमध्ये ही संस्था पुन्हा एकदा धान्य वाटपासह इतरही जिवनाश्यक गोष्टींचे वाटप करणार आहे. तसेच ही संस्था फक्त तृतीयपंथींनाच नाही, तर निराधार महिलांना देखील मदत करते. सरकारने रिक्षावाले, फेरीवाले, घर कामगार यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र, तृतीयपंथीयांची यामध्ये दखल घेतलेली नाही. परंतु सरकारने असा भेदभाव न करता या तृतीयपंथीयांसाठीही आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी या संस्थेने केली आहे.

फिरण्यास बंधने
राज्यात ३० एप्रिलपर्यंत १४४ कलम लागू करण्यात आलेले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व वर्गातील लोकांना बाहेर फिरण्यास बंधने आहेत. त्यामुळे ज्यांचे जीवनच भिक्षेवर अवलंबून आहे, त्या तृतीयपंथीयांसमोर पुढील दिवस कसे घाालवायचे, असाच प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर यांना मदत म्हणून 'किन्नर माँ' ही संस्था पुढे आली आहे. गेल्यावर्षीच्या लॉकडाऊनमध्ये या संस्थेने तृतीयपंथीयांसाठी मोठे काम केले होते. सुमारे ७० हजार तृतीयपंथीयांना या संस्थेने धान्य आणि गरजेच्या वस्तूंचे वाटप केले होते. त्याबरोबरच २० हजार महिलांना देखील या संस्थेने मदत केली आहे. आता पुन्हा राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. गेल्यावर्षी जशी परिस्थिती उद्भवली होती तशीच परिस्थिती यावर्षी उद्भवली आहे. यामध्ये यांची पुन्हा उपासमार होऊ नये म्हणून या संस्थेने तृतीयपंथीयांना मदत करायला सुरुवात केली आहे. धारावी सायन भागात यातील काही मदत पोहोचवण्यात आली.

तृतीयपंथीयांना आर्थिक पॅकेज मिळावे -'किन्नर माँ' संस्थेची मागणी

'..तर आम्ही जगायचे कसे?'
आमचा उदरनिर्वाहच जर भिक्षेवर अवलंबून आहे तर आम्ही जगायचे कसे? आम्हाला भीकच कोणी देणार नसेल तर, आमच्या उदरनिर्वाहाच काय? असा प्रश्न करत, ज्याप्रमाणे इतर राज्यांमध्ये सरकार तृतीयपंथीयांना मासिक दोन हजार रुपयांची मदत करते, त्याप्रमाणे आपल्या सरकारनेही ही मदत दिल्यास अनेक तृतीयपंथीयांच्या उदरनिर्वाहाचा मार्ग मोकळा होईल. सरकारने जे ५६०० कोटीचे पॅकेज जाहीर केले, त्यामध्ये अनेकांना तरतूद केली. मात्र, आम्हा तृतीयपंथीयांसाठी त्यामध्ये काही तरतूद केली नाही. सरकारने जर अन्नधान्य, आर्थिक मदत केल्यास समाजातील या उपेक्षित घटकाला पुन्हा उभे राहण्यास मदत होईल, अशी मागणी संस्थेने मुखमंत्र्याकडे केली असल्याचे 'किन्नर माँ ट्रस्ट'च्या अध्यक्ष सलमा खान यांनी सांगितले.

हेही वाचा -लढा कोरोनाविरुद्धचा : ५ महिन्याची गर्भवती डीएसपी कर्तव्य बजावण्यासाठी उतरली रस्त्यावर

Last Updated : Apr 21, 2021, 12:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.