ETV Bharat / state

स्वच्छ रेल स्वच्छ भारत 2019 : किंग्ज सर्कल ठरले स्वच्छ-सुंदर रेल्वे स्थानक - स्वच्छ व सुंदर रेल्वेस्थानक

भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 'स्वच्छ रेल स्वच्छ भारत 2019' च्या झोनल रँकिंगमध्ये हार्बर मार्गावरील किंग्ज सर्कल या रेल्वे स्थानकाने आठव्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे. तसेच स्थानकावरील प्रवाशांची संख्या आणि महसूल या विभागातून किंग्ज सर्कल स्थानकाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. किंग्ज सर्कल हे स्थानक मुंबईतील माटुंगा भागात मध्यस्थानी आहे.

किंग्ज सर्कल रेल्वेस्थानक
author img

By

Published : Nov 18, 2019, 5:56 PM IST

Updated : Nov 18, 2019, 9:39 PM IST

मुंबई - भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. यात रेल्वे स्थानकांचा देखील समावेश आहे. हार्बर मार्गावरील किंग्ज सर्कल या रेल्वे स्थानकाने स्वच्छ व सुंदर स्थानकांच्या यादीत स्थान मिळवले आहे. किंग्ज सर्कल स्थानकाने 'स्वच्छ रेल स्वच्छ भारत 2019'च्या झोनल रँकिंगमध्ये आठवा तर, प्रवाशांची संख्या आणि महसूल या विभागातून दुसरा क्रमांक पटकावला आहे.

किंग्ज सर्कल ठरले स्वच्छ-सुंदर रेल्वे स्थानक

किंग्ज सर्कल हे स्थानक मुंबईतील माटुंगा भागात मध्यस्थानी आहे. या या स्थानकाच्या शेजारी झोपडपट्टी आहे .या स्थानकात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता बघायला मिळात होती. मात्र स्थानकाचे आत्ताचे चित्र वेगळे आहे. स्थानकाच्या शेजारीच एक बाग उभारण्यात आली आहे. स्थानकाच्या भिंतींवर प्रेरणादायी सामाजिक सुविचार लिहलेले आहेत. एक स्थानिक संस्था आणि रेल्वे स्थानक प्रबंधक एन के सिन्हा यांच्या प्रयत्नांतुन स्थानकाचे रूप बदलले आहे.

हेही वाचा - स्वच्छता अभियानांतर्गत पश्चिम रेल्वेची 4 हजार जणांवर कारवाई; 109 टन कचरा काढला बाहेर

स्थानक स्वच्छ राहावे यासाठी मी कायम प्रयत्न करतो कारण स्टेशन हे माझे दुसरे घर आहे. ते स्वच्छ ठेवणे माझी जबाबदारी आहे. रोजच्या कामाव्यतिरिक्त इथे स्वच्छता ठेवण्यासाठी काम केल्यावर मला समाधान मिळते,असे स्थानक प्रबंधक सिन्हा यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. स्थानकात झालेल्या या बदलाचे प्रवाशांकडूनही कौतुक होत आहे.

Intro:भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर गेल्या वर्षांपासून स्वच्छता मोहीम राबवली जात आहे . पूर्वी मुंबईतील रेल्वे स्थानके अस्वच्छ मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे प्रवासी स्थानकातून लवकरात लवकर निघण्यासाठी प्रयत्न करायचे परंतु भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मुंबईतील स्थानक ही सुंदर स्वच्छ बनलेली आहेत त्यात किंग सर्कल हे हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानक स्वच्छ व सुंदर स्थानकात अव्वल ठरले आहे या किंग सर्कल स्थानकाला स्वच्छ रेल स्वच्छ भारत 2019 च्या झोनल रँकिंगमध्ये आठव्या क्रमांकाचे पारितोषिक मिळालेले आहे व किंग सर्कल स्थानकावरील प्रवाशांची संख्या आणि महसूल या एसजी विभागातून किंग सर्कल स्थानकाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. हे फक्त या स्थानकातील सौंदर्य व स्वच्छता यामुळेच शक्य झाले आहे असे स्टेशन प्रबंधक एन के सिंह यांनी सांगितले

Body:किंग सर्कल हे स्थानक मुंबईतील माटुंगा भागातील मध्यस्थानी आहे. या या स्थानकाच्या शेजारी झोपडपट्टी आहे .त्यामुळे या स्थानकात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता बघायला मिळायची. मात्र या स्थानकाचे आत्ताचे चित्र वेगळे आहे हे स्थानक स्वच्छ व हरित पाहायला मिळत आहे या स्थानकाच्या शेजारीच एक बाग उभारण्यात आलेली आहे या बागेत सुंदर फुलं व नवीन नवीन रोपटे लावण्यात आलेले आहेत स्थानकाच्या दिवालांवर प्रेरणादायी व सामाजिक संदेश देणारे सुविचार लिहलेले आहेत .हे सर्व रेल्वे प्रशासनाच्या खर्चातून नाही तर एक स्थानिक संस्थेच्या मदतीने,विद्यार्थ्यांचा स्थानक प्रबंधक यांनी हे केलेले आहे. या स्थानकात प्रवाशांना बसावसं वाटतं व हे आमच्या घरा सारखेच आहे असे प्रवासी या स्थानकाचे कौतुक करताना सांगतात

Conclusion:स्टेशन स्वच्छ राहावे यासाठी मी कायम प्रयत्न करतो कारण स्टेशन हे माझे घर आहे ते स्वच्छ ठेवून आहे माझी जबाबदारी आहे त्यामुळे स्थानका बाहेर सौंदर्य व स्वच्छता ठेवणे हे माझे परम कर्तव्य आहे स्थानकांवरील पायर्‍यांना रांगोळी च्या पद्धती रंग देणे स्थानकाच्या शेजारी असलेल्या बागेला पाणी देणे व नवीन रोपटे मोठी करणे यातून कामाव्यतिरिक्त खूप मोठे समाधान मिळते असे स्थानक प्रबंधक एन के सिन्हा यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले

Last Updated : Nov 18, 2019, 9:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.