मुंबई : राज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिला गेला. त्या पुरस्काराच्या सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार याशिवाय अनेक व्यक्ती या कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे कोणतेही नियोजन नसल्यामुळे 14 लोकांचा मृत्यू झाला.
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा: या घटनेला महाराष्ट्र शासनाचे महायोगी उपमुख्यमंत्री आणि आप्पा धर्माधिकारी त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि सीबीआय चौकशी करा अशी मागणी करणाऱ्या याचिका न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश संजय गंगापूरवाला आणि संदीप मारणे यांनी दाखल करून घेतली आहे. याचिका कर्त्याच्या वतीने वकील नितीन सातपुते यांनी ही बाब किती गंभीर आहे, हे न्यायालयाच्या द्विख खंडपीठांसमोर मांडले आहे. संबंधित मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या संदर्भात आम्ही जी चौकशी मागणी केलेली आहे, त्याचा न्यायालयाने विचार करावा ही बाजू त्यांनी मांडली आहे.
काय आहे प्रकरण: मागच्या 15 दिवसांपूर्वीच नवी मुंबई खारघर या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा शासनाने आयोजित केला होता. या पुरस्कार सोहळ्याचे पुरस्कार मूर्ती होते अप्पासाहेब धर्माधिकारी होते. या पुरस्काराच्या सोहळ्याच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री यांनी वीस लाख लोक येतील अशी घोषणा कार्यक्रमाच्या तीन दिवस आधी केली होती. कार्यक्रमाच्या दिवशी लाखो लोक खारघर येथील या पुरस्काराच्या निमित्ताने जमले आणि गर्दी, चेंगराचेंगरी व उष्माघात होऊन लोक मृत पावले, अशी भूमिका याचिकेत मांडली आहे.
शासनाला जनतेच्या जीविताची काळजी नाही: या पुरस्काराच्या सोहळ्याच्या प्रसंगी जेव्हा जनता आपला जीव वाचवण्यासाठी वाट काढत होती. पाण्यासाठी तहानलेली होती. त्यांच्या शरीरातील पाणी कमी झाले होते. ते आपल्या जीवाच्या आकांताने स्वतःला वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होते. तेव्हा त्यांना वाचवायला शासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नव्हती. त्याच वेळेला शासनाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, पालकमंत्री इतर अनेक मान्यवर हे जेवण करत होते. मात्र इकडे जनता भुकेने आणि पाण्याने व्याकुळ झाली होती. त्यामुळेच या शासनाला जनतेच्या जीविताची काही फिकर नाही, अशा आशयाची याचिका अॅडव्होकेट नितीन सातपुते यांनी आज दाखल केली.
खारघरमध्ये रस्काराचा सोहळा पार पडला: अॅड. नितीन सातपुते म्हणाले की, महाराष्ट्र आणि देशाला माहित आहे खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा सोहळा पार पडला. त्यावेळेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याशिवाय राज्याचे अनेक मंत्री त्यावेळी उपस्थित होते. मात्र लाखो जनता येणार हे माहिती असूनही कोणतेही पूर्व नियोजन नव्हते. लोकांच्या खाण्याची पिण्याची, आरोग्याची काळजी शासनाने घेतली नाही. या गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन अनेक लोक मरण पावले. याला कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आप्पासाहेब धर्माधिकारी हे आहेत. त्यामुळे या संबंधित सर्व मंडळींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.