ETV Bharat / state

Gram Panchayat Election 2023 : जनतेचा कौल महायुतीच्या पारड्यात - केशव उपाध्ये

Gram Panchayat Election 2023 : राज्यातील जनतेने अखेरीस आपला कौल महायुतीच्या पारड्यात टाकला आहे. महायुतीला दणदणीत यश मिळवून दिलं असून महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता हे सत्य स्वीकारावं, असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिला.

Keshav Upadhye reaction on Gram Panchayat Election 2023 result
भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2023, 2:13 PM IST

मुंबई Gram Panchayat Election 2023 : राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. दरम्यान, या निकालांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलत असताना ते म्हणाले की, राज्यात नुकत्याच झालेल्या 2359 ग्रामपंचायतीचा निकाल हाती येत आहे. या निकालापैकी 723 जागांवर चा निकाल स्पष्ट झाला असून या निकालामध्ये महा युतीने दणदणीत यश संपादन केलंय. 723 जागांपैकी 432 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे तर केवळ दीडशे जागांवर महाविकास आघाडीला समाधान मानावं लागलं आहे, असा दावा केशव उपाध्ये यांनी केलाय.

उद्धव ठाकरे सर्वात शेवटी : पक्षीय बलाबल पाहता राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने नेहमीप्रमाणे शेवटचा क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल आपण त्यांचे विशेष अभिनंदन करतो असा टोला उपाध्ये यांनी लगावला. आतापर्यंत स्पष्ट झालेल्या जागांमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 210 शिवसेना शिंदे गटाला 110 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 121 काँग्रेसला 65 शरद पवार गटाला 51 तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 34 जागांवर समाधान मानावे लागले आहे, त्यामुळे दररोज सकाळी राज्यात जनतेला ओरडून सांगून निवडणुका घ्या मग दाखवू असे म्हणणाऱ्यांना जनतेने त्यांची जागा दाखवली आहे असंही उपाध्य म्हणाले.

दिग्गजांचा झाला पराभव : दरम्यान, या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक आमदारांना आपला वेळ प्राप्त झलेला नाही. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना पराभव पत्करावा लागला आहे. तर शिवसेनेचे वैभव नाईक यांना वैभववाडीत धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलंय. त्यामुळं जनता नेमकी कुणाच्या बाजूनं आहे, हे स्पष्ट झालंय. जनता विकासाच्या बाजूनं म्हणजेच भाजपाच्या बाजूनं असल्याचंही यावेळी उपाध्ये म्हणाले.

हेही वाचा -

  1. Gram Panchayat Election 2023 : सत्ताधारी भाजपाला जर मीडियाकडे जावं लागत असेल तर हे गृहमंत्र्यांचं अपयश - सुप्रिया सुळे
  2. Gram Panchayat Election 2023 : राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी; जनतेचा कल नेमका कुणाच्या बाजूनं?
  3. Gram Panchayat Elections : राधानगरीत संभाजीराजेंच्या 'स्वराज्य संघटनेचा' पहिला झेंडा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.