ETV Bharat / state

राज्यात मोगलाई अवतरली, रामभक्तांवर कारवाई केल्यानं केशव उपाध्येंची राज्य सरकारवर टीका

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त शांततेत आनंदोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांवर महाविकास आघाडी सरकारने कारवाई करून मोगलाईचे दर्शन घडवल्याची टीका भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.

author img

By

Published : Aug 6, 2020, 6:22 PM IST

Keshav Upadhyay criticizes on state government for taking action against Ram devotees in mumbai
रामभक्तांवर कारवाई केल्यानं केशव उपाध्येंची राज्य सरकारवर टीका

मुंबई - अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त शांततेत आनंदोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांवर महाविकास आघाडी सरकारने कारवाई करून मोगलाईचे दर्शन घडवल्याची टीका भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कोरोना महामारीच्या काळात सर्व नियम, बंधने पाळूनच हा आनंदोत्सव साजरा करण्याच्या सूचना पक्षातर्फे राज्यभरातील कार्यकर्त्यांना देण्यात आल्या होत्या. असे असताना पोलीस यंत्रणेने काही ठिकाणी दबावतंत्राचा वापर होऊन आनंदोत्सव होणारच नाही, यासाठी प्रयत्न केले. पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांनी 10 लाख लाडूचे वाटप करण्याचे ठरवले होते. मात्र, पोलिसांनी लाडू वाटप करण्यास प्रतिबंध केला. अनेक ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमा आणि झेंडे जप्त केले. इंदापूर, बारामती, सासवड येथे कार्यक्रम होऊच दिले नसल्याचे केशव उपाध्ये म्हणाले.

विदर्भात अमरावती, बडनेरा, परतवाडा, पुसद, अकोला येथे पोलिसांनी कार्यकर्त्यांना धमकावण्याचे प्रकार घडले. 'कार्यक्रम केला तर बघा, गुन्हे दाखल करू', अशी भाषा पोलिसांकडून वापरली गेली. नागपूर येथे बॅनर, झेंडे लावू दिले नाहीत. नाशिक येथे काळाराम मंदिर परिसरात अंतर राखण्याचे सर्व नियम पाळून आनंदोत्सव साजरा करण्याची विनंती पोलिसांनी फेटाळून लावली. काळाराम मंदिर परिसरात सर्वत्र बॅरिकेट्स लावले गेले. अखेर आमदार देवयानी फरांदे यांनी बंदी हुकूम मोडून रामकुंडावर आरती केली. परभणी येथे पेढे वाटप कार्यक्रम पोलिसांनी बंद पाडला आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मालेगाव येथे झेंडेही लावू दिले नाहीत. परळी येथे आनंदोत्सव साजरा करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले गेले. सिन्नर येथे आरती केल्याबद्दल शहर अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांना 3 तास पोलीस स्थानकात स्थानबद्ध केले गेले. अनेक ठिकाणी कार्यक्रमात भाग घेणाऱ्या कार्यकर्त्यांची नावे लिहून घेतली गेली. कराड येथे महिला कार्यकर्त्यांना कार्यक्रम करू दिला नाही. अकलूज येथेही कार्यकर्त्यांना पोलिसांकडून दमदाटी केली गेली. झेंडे, पताका लावण्यास प्रतिबंध केला गेला. हे प्रकार पाहिल्यावर आनंदोत्सव साजरा होऊ द्यायचाच नाही, असा सरकारचा छुपा अजेंडा होता, अशी शंका येते, असे उपाध्ये म्हणाले. नगर जिल्ह्यात पोलिसांनी कहर करून कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, नेवासा, शेवगाव या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. काँग्रेसबरोबर आघाडी केली म्हणून, हिंदुत्व सोडले नाही असे सांगणाऱ्या शिवसेनेचे खरे स्वरूप या निमित्ताने दिसून आले. सत्तेसाठी सेनेने रामराज्याचा मार्ग सोडला आणि मोगलाई स्वीकारली हेच या घटनांवरून स्पष्ट दिसत असल्याचे उपाध्ये म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.