ETV Bharat / state

KEM Hospital : के ई एम रुग्णालयात सीलिंगचा भाग कोसळून महिला जखमी - KEM Hospital

पालिकेच्या केईएम रुग्णालयात आज सकाळी शिक्षण घेणाऱ्या नर्सेस क्वार्टरमधील सिलिंगचा काही भाग कोसळला ( ceiling collapsed woman injured ) आहे. यात एक महिला जखमी झाली आहे. रुग्णालयामध्ये शिकण्यासाठी येणाऱ्या नर्सेस क्वार्टरमध्ये हा प्रकार समोर आला आहे. एखाद्याचा जीव गेल्यावर पालिका प्रशासन आणि के ई एम रुग्णालय प्रशासन ( KEM Hospital ) जागे होणार का असा प्रश्न माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी उपस्थित केला आहे.

KEM Hospital
के ई एम रुग्णालय
author img

By

Published : Nov 3, 2022, 3:33 PM IST

मुंबई : पालिकेच्या केईएम रुग्णालयात आज सकाळी शिक्षण घेणाऱ्या नर्सेस क्वार्टरमधील सिलिंगचा काही भाग कोसळला ( ceiling collapsed woman injured ) आहे. यात एक महिला जखमी झाली आहे. रुग्णालयामध्ये शिकण्यासाठी येणाऱ्या नर्सेस क्वार्टरमध्ये हा प्रकार समोर आला आहे. एखाद्याचा जीव गेल्यावर पालिका प्रशासन आणि के ई एम रुग्णालय प्रशासन ( KEM Hospital ) जागे होणार का असा प्रश्न माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी उपस्थित केला आहे. मोठी दुर्घटना होण्याआधी पालिका प्रशासन आणि के ई एम रुग्णालय प्रशासन यांनी लक्ष द्यावे अशी मागणी कोकीळ यांनी केली आहे.

महिला जखमी : मुंबई पालिकेचे परेल येथे के ई एम रुग्णालय आहे. पालिकेच्या सर्वात मोठ्या रुग्णालयात याचा समवेश आहे. रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय तसेच नर्स प्रशिक्षण केंद्रही चालवले जाते. यात ३०० विद्यार्थीनी नर्सचे शिक्षण घेत आहेत. शिक्षण घेणाऱ्या नर्स विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल बनवण्यात आले आहे. १९२६ मध्ये ही इमारत बांधण्यात आली होती. रुग्णालयात दुरुस्तीचे काम सुरू असेल तरी या हॉस्टेलची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. आज सकाळी ९.३० च्या सुमारास नर्स विद्यार्थ्यांसाठी असलेल्या हॉस्टेलमध्ये जेवण बनवण्यासाठी संगीता चव्हाण वय ४० वर्षे या आल्या असता सिलिंगचा काही भाग कोसळला. यात चव्हाण यांच्या डोक्याला मार लागला आहे. याआधीही फॅनसह स्लॅब कोसळला होता अशी माहिती कोकीळ यांनी दिली.

दुरुस्तीची मागणी : सिलिंगचा भाग कोसळताच तातडीने स्थानिक आमदार अजय चौधरी यांच्या समवेत मी परिस्थितीची पाहणी केली आणि तेथील विद्यार्थ्यांना दिलासा दिला. याबाबत तातडीची बैठक आयोजित करून त्वरित दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाला सांगितले आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांची इतर ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी सूचना केली आहे. दुरुस्तीबाबत गेले २ ते ३ वर्षे सतत पाठपुरावा केला आहे. त्यानंतरही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. एखाद्याचा जीव गेल्यावर पालिका प्रशासन आणि के ई एम रुग्णालय प्रशासन जागे होणार का असा प्रश्न माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी उपस्थित केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.