ETV Bharat / state

कालिदास कोळंबकरांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा; भाजपमध्ये बुधवारी करणार प्रवेश - BJP

कालिदास कोळंबकर हे मुंबईतील वडाळा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत. सलग सातवेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत. नारायण राणे यांच्यासोबत त्यांनी शिवसेना सोडली होती.

कालिदास कोळंबकर
author img

By

Published : Jul 29, 2019, 10:49 PM IST

मुंबई - काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी सोमवारी (28 जुलै) काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे शिवसेना ते काँग्रेस पर्यंतच्या प्रवासातील समर्थक म्हणून ओळखले जातात.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे कालिदास कोळंबकर यांनी राजीनामा सुपूर्द केला. कोळंबकर बुधवारी ३१ जुलैला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

कालिदास कोळंबकर हे मुंबईतील वडाळा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत. सलग सातवेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी कोळंबकर भाजपमध्ये जात असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, त्यापूर्वीच नारायण राणे भाजपतर्फे राज्यसभेवर गेले. त्यामुळे कोळंबकर यांच्या भाजप प्रवेशावर अनेकदा चर्चा होऊनही त्यांचा प्रवेश लांबणीवर पडला होता.

विधानसभेच्या निवडणुकांना काही महिने असताना कोळंबकर यांनी भाजपमध्ये जाण्याचे ठरवले आहे. त्यामुळेच त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Intro:कोळंबकर यांनी दिला काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा, बुधवारी भाजपामध्ये होणार सामील

मुंबई, ता. २९ :

शिवसेनेपासून ते काँग्रेस पर्यंतच्या प्रवासात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी आज काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
हा राजीनामा त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सुपूर्द केला आहे. अनेक महिन्यांपासून भाजपाच्या बोहाल्यावर चढण्यासाठी मुहूर्त शोधत असलेल्या कोळंबकर यांना अखेर बुधवारी ३१ जुलैचा मुहूर्त सापडला असल्याने ते या दिवशी भाजपामध्ये सामील होणार आहेत.
कालिदास कोळंबकर हे मुंबईतील वडाळा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत.
सलग सातवेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत.
लोकसभा निवडणुकांपूर्वी कोळंबकर हे भाजपामध्ये जात असल्याच्या चर्चा होत्या, मात्र त्यापूर्वीच राणे भाजपाच्या जवळ जाऊन राज्यसभेवर गेले, त्यामुळे कोळंबकर यांच्या भाजप प्रवेशावर अनेकदा चर्चा होऊनही त्यांचा मुहूर्त टळला होता.
आता त्यांनी विधानसभेच्या निवडणुका लक्षात भाजपमध्ये जाण्याचे ठरवले आहे. त्यामुळेच आज त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहेBody:कोळंबकर यांनी दिला काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा, बुधवारी भाजपामध्ये होणार सामील
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.