ETV Bharat / state

International Yoga Day : लहानापासून थोरापर्यंत योग अ‍ॅडवायझेबल, स्वतःसाठी किमान 1 तास काढावा - योगाची प्रॅक्टिस करा

भारत सरकारच्या पुढाकाराने २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. परंतु योग म्हणजे योगासने करणे किंवा प्राणायाम करणे अशी छोटी कल्पना करून चालणार नाही. योगासनांचा उपयोग शरीरातील काही विकृतींवर होऊ शकतो पण आसन, प्राणायाम ही अष्टांग योगातील दोन अंग आहेत, असे योग प्रशिक्षक सांगतात.

International Yoga Day
International Yoga Day
author img

By

Published : Jun 20, 2023, 5:28 PM IST

Updated : Jun 21, 2023, 8:18 AM IST

योग प्रशिक्षक केतन ठाकूर यांची प्रतिक्रिया

मुंबई : योग हे एक अतिप्राचीन भारतीय शास्त्र आहे. जीवनात आपल्या वागण्याने भेद आणि असंतुलन निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र योगाभ्यासामुळे ते टाळून एकता, संतुलन आणि कार्यकुशलता साधता येते. शरीरासाठी व्यायामाचा उपयोग होतो. तसेच योगाचा उपयोग हा प्राधान्याने मानसिक तसेच हॉर्मोनल पातळीवर होत असतो.

एक तास किमान वेळ द्या : योग हा शब्द ‘जोडणे’ किंवा ‘एकत्र येणे’ या शब्दापासून तयार झालेला आहे. त्यामुळे शरीर, मन आणि आत्म्याचा परमतत्त्वाशी संयोग साधण्याची कला म्हणजे ‘योग’. योग प्रशिक्षक केतन ठाकूर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, योगाचा अर्थ जो आहे. तो म्हणजे कनेक्शन स्वतःला स्वतःशी कनेक्ट करणे. आजकालच्या युवात सर्वाना स्वतःसाठी टाईम नाही. परंतु आपण एक तास किमान स्वतःसाठी काढावा. त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल. कारण योगामुळे आपल्याला मानसिक दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या किंवा मग भावनिकदृष्ट्या फायदा मिळतो.

योगाची प्रॅक्टिस करा : योगा लहानापासून ते आपण मोठ्यांपर्यंत सर्वांनी करावा. सर्वांसाठी योगा एडवायजेबल आहे. कारण की त्याचे काही नुकसान नाही. परंतु आपण एखाद्या चांगल्या प्रशिक्षकाच्या हाताखाली मार्गदर्शनाने आपण प्रॅक्टिस करावी, ते फार जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की योगा करताना काही चुकीच्या गोष्टी आपल्याकडून नाही घडल्या पाहिजे. जेणेकरून आपल्या नुकसान होईल. योगा सकाळी करा, संध्याकाळी करा तुम्हाला जर तुमचा वेळ असेल तुमच्या लाईफस्टाईलप्रमाणे करा. परंतु एक काळजी घ्या की तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तुमचे पोट रिकामे असावे.

योग म्हणजे आत्मसमर्पण : 21 जून येत आहे. योग दिनानिमित्त तुमच्यासाठी माझ्याकडून एक छोटीशी सूचना आहे. म्हणजे क्रिया योग. ते म्हणजे तप, स्वाध्याय आणि ईश्वर पाणिदान. योगशास्त्रातील ही अत्यंत महत्त्वाची संज्ञा आहे. क्रिया योग म्हणजे काय. तो खूप चांगले आहे. तप म्हणजे तुमची मेहनत आणि स्वाध्याय म्हणजे आत्मअध्ययन आणि ईश्वर पाणिदान म्हणजे आत्मसमर्पण. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल, हा एक मंत्र तुमच्या जीवनात साधला तर तुमची प्रगती होऊ शकते, असा सल्ला योग प्रशिक्षक केतन ठाकूर यांनी दिला.

हेही वाचा - Food For Healthy Teeth : दात निरोगी ठेवायचे आहेत? या पदार्थांचा आहारात समावेश करा

Last Updated : Jun 21, 2023, 8:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.