ETV Bharat / state

Mumbai Crime: रिसॉर्ट बुक करण्याच्या नावाखाली हजारोंचा गंडा; 'हॅरी'ला जुहू पोलीसांनी ठोकल्या बेड्या

author img

By

Published : Jan 31, 2023, 10:14 AM IST

जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विलेपार्ले येथे राहणाऱ्या साहिल नितीन झवेरी या इसमाला रिसॉर्ट बुक करण्याच्या नावाखाली एका ठिकाणी 39 हजार रुपयांचा गंडा घातला. त्यानंतर साहिल यांनी जुहू पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर पोलीसांनी मोबाईल नंबरद्वारे तपास करून आरोपी हरविंदरसिंग लोहिया उर्फ हॅरी याला मालाड येथील मालवणी परिसरातून अटक केली.

Mumbai Crime
आरोपी हरविंदरसिंग लोहिया उर्फ हॅरी

मुंबई: तक्रारदार साहिल नितीन झवेरी (वय 33) यांचा ट्रॅव्हल कंपनीचा व्यवसाय आहे. 14 नोव्हेंबर 2022 ला जुहू पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. साहिल यांची सॉलेटेअर हॉलीडेज नावाची ट्रॅव्हल कंपनी आहे. त्यातून मिळणाच्या उत्पन्नावर त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो. 2019 मध्ये साहिल यांची क्लाएंटसाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये जनरल मॅनेजर म्हणून काम करीत असल्याची बतावणी केलेल्या हरविंदरसिंग लोहिया उर्फ हॅरी याच्याशी कामानिमीत्त ओळख झाली होती.

७ लोकांची अ‍ॅडव्हान्स बुकिंग: २०१९ ते २०२१ मध्ये हॅरी हा साहिल यांच्या सांगण्यावरून रेन फॉरेस्ट रिसार्ट, इगतपुरी येथील क्लाइन्टची बुकींग करत असे. 11 नोव्हेंबर 2022ला साहिलचे आपल्या मित्रांसह इगतपूरी नाशिक येथे जायचे ठरले. त्यानुसार त्यांनी 2 नोव्हेंबर 2022 ला रेन फॉरेस्ट रिसार्ट, इगतपुरी येथे त्याचे बुकींग करण्यासाठी हॅरीला कॉल केला. तेव्हा हॅरी याने त्यांना ७ लोकांच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगसाठी 39 हजार रूपये त्याच्या गुगल पेवर पाठवण्यास सांगितले. त्यावर साहिल यांचा मित्र नामे रोमिल जोशी, प्रितम जैन, भूपेश मिली, गंवान छेड़ा, विजेश शाह यांनी प्रत्येकी 6 हजार रुपये असे 30 हजार रूपये आरोपी हॅरीच्या मोबाइल क्रमांकावर गुगल पेने पाठवले.

बुकींग कन्फर्मचा मेल: त्यानंतर 4 नोव्हेंबर 2022 ला रोजी हॅरीने त्याच्या मेल आयडीवरून साहिल यांना त्यांच्या मेलवर त्यांची बुकींग कन्फर्म झाली असल्याबाबत इई-मेल पाठवला. दरम्यान बुकिंग झाल्याची खात्री पडल्यानंतर साहिल यांनी हॅरी याच्या मोबाईल क्रमांकावर गुगल पे ने 6 हजार रूपये पाठवले. तसेच दिनांक 11 नोव्हेंबर 2022 ला साहिल यांचा मित्र चिराग संचेती याने ३ हजार रूपये हॅरीला गुगल पे ने पाठवले. असे एकूण 39 हजार रूपये साहिलसह त्याच्या मित्रांनी हॅरीला पाठवले.

फसवणूकीपासून सावध करण्यासाठी पोस्टर: त्यानंतर दिनांक 11 नोव्हेंबर 2022ला साहिल याचे मित्र रोमिल जोशी, प्रितम जैन, भुपेश मिस्त्री, रॉबीन छेडा, ब्रिजेश शाह हे रेन फॉरेस्ट रिसार्ट, इगतपुरी येथे पोहचले. त्यांनी रिसॉर्टच्या रिसेप्शनवर असलेल्या इसमास त्यांनी विचारणा केली. तेव्हा रिसेप्शनवर असलेली व्यक्ती बिट्टूने इसमनामे बिट्टू याने साहिलच्या मित्रांना त्यांचे रिसॉर्टमध्ये बुकींग नसल्याची माहिती दिली. तेव्हा साहिलच्या पायाखालची जमीन सरकली. साहिलने ताबडतोब बिट्टू यास हरविंदरसिंग लोहिया उर्फ हॅरी याने त्यांची बुकींग केलेली असल्याचे सांगितले. तेव्हा हॅरी याने २ वर्षापूर्वीच हॉटेल सोडलेले असल्याचे तसेच त्याने बऱ्याच लोकांना अशाप्रकारे फसवले असल्याचे बिट्टू याने सांगितले. तसेच बिट्टू याने साहिलच्या मित्रांना हॅरी हा लोकांची करत असलेल्या फसवणूकीपासून सावध करण्यासाठी त्यांनी बनवलेली पोस्टरची कॉपी व्हॉट्स अपवर पाठवली.

बुकिंग न करता फसवणुक: बिट्टू याने आरोपी हॅरी याचा विक्रोळी येथील पार्कसाईट परिसरातील राहता पत्ता दिला. हॅरीच्या वडिलांचा मोबाईल नंबर दिला. त्यानंतर साहिल याने हॅरीला कॉल करून बुकिंग बाबत विचारणा केली. तेव्हा त्याने त्यांचे बुकींग झालेले नसून पैसे तो परत करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर हॅरीला वारंवार फोन करून विचारणा केली असता हॅरी याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यांचे फोन उचलणे बंद केले. त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने 14 नोव्हेंबर 2022ला जुहू पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रार अर्ज दाखल केला होता. रिसॉर्टमध्ये बुकिंग न करता फसवणुक केली म्हणून साहिल यांनी आरोपी हरविंदरसिंग लोहिया उर्फ हॅरी याच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दिली. भारतीय दंड संविधान कलम 499, 420सह कलम 66- क माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली: पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक मसवेकर यांनी आरोपी हरविंदरसिंग समशेरसिंग लोहिया उर्फ हॅरी त्याच्या राहत्या घरी तसेच परिसरात शोध घेतला. परंतु आरोपी हा त्याच्या विक्रोळी येथील राहत्या घरी मिळून आला नाही. तसेच तो सध्या नमूद ठिकाणी राहत नसल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर हॅरीने वापरलेल्या मोबाईल क्रमांकाच्या सीडीआरद्वारे माहिती घेऊन मालाड पश्चिम मालवणी येथे आले. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माने व पोलीस पथकास या गुन्हयातील संपूर्ण माहिती देऊन आरोपीला मालवणी येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. हरविंदरसिंग समशेरसिंग लोहिया रिसॉर्ट बुक करून देण्याच्या नावाखाली मेघवाडी पोलीस स्टेशन पार्कसाईट पोलीस स्टेशन आधी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.

हेही वाचा: Satara Crime : अट्टल चोरट्याकडून घरफोडीचे १७ गुन्हे उघड; ६२ तोळे दागिने हस्तगत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.